Havan for Devendra Fadnavis (Photo Credits: Facebook, Twitter/PManoj222)

महाराष्ट्र राज्यात सत्ता स्थापनेचा संघर्ष अगदी शेवटच्या क्षणापर्यंत भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांमध्ये सुरु आहे. सर्वच राजकीय पक्षांकडून सत्ता स्थापनेच्या दृष्टीने वेगवान हालचाली होत असल्या तरी शिवसेना आणि भाजप मात्र आपल्या मुख्यमंत्री पदाच्या (Maharashtra CM) अटीवर अद्याप असून बसले आहेत.

अशा परिस्थितीत भाजपचाच मुख्यमंत्री व्हावा यासाठी मागच्या काही दिवसांपासून भाजप कार्यकर्त्यांकडून होम हवन तसेच पूजा अर्चा करण्यात येत आहे. आज दिनांक 8 नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजून ४० मिनिटांनी मुंबई येथील साउथ इंडियन भजन समाज मंदिर, शंकर मठाच्या समोर, माटुंगा सेंट्रल पूर्व येथे आमदार कॅप्टन तमिल सेल्वन यांनी अशाच एका होम हवनाचे आयोजन केले होते. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनीच पुन्हा एकदा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री बनावे यासाठी हवन आयोजित करण्यात आला होता.

पहा हा व्हिडिओ

तसेच काल (7 नोव्हेंबर रोजी) मुख्यमंत्र्यांना मंगळ असल्याने शपथविधीमध्ये मंगळ आडवा येऊ नये यासाठी आमदार स्मिता वाघ आणि माजी जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांनी अंमळनेर येथील प्रसिद्ध मंगळग्रह मंदिरात महाभिषेक केला होता.

नागपूरमध्येही भाजप नेते भुषण शिंगने यांनी काल एका पुजेचं आयोजन केलं होतं. नागपूरच्या कल्याणेश्वर मंदिरात ही पुजा करण्यात आली.

Maharashtra Government Formation: अमित शाह यांनी सरकार स्थापनेवर मौन का बाळगले आहे? वाचा सविस्तर

त्यामुळे सत्ता स्थापनेच्या या शेवटच्या घटकेत देवेंद्र फडणवीस यांना सत्ता स्थापन करण्यात व मुख्यमंत्री पद पुन्हा एकदा मिळवण्यात यश मिळतं का हे बघणं महत्त्वाचं ठरेल.