Sharad Pawar | (Photo Credits: twitter)

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका होऊन महिना होत आला तरीही सत्ता स्थापनेचा तिढा काही सुटत नाहीय. महाराष्ट्रातील राजकारण दिवसेंदिवस वेगवेगळी वळणं घेत असून कोणताही पक्ष ठाम निर्णयावर येत नाहीय. त्याच प्रत्येक पक्षांची विधानं या वातावरणाला आणखी वेगळी वळणं देत आहेत. त्यात आता राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी ANI ला दिलेल्या मुलाखतीत केलेल्या विधानाने महाराष्ट्राच्या राजकारणाचे रुप पालटून टाकले आहे. आहे. भाजप-शिवसेना ही निवडणूक एकत्र लढले तर दुसरीकडे काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र लढले त्यामुळे त्या दोन पक्षांनी त्यांनी त्यांचा मार्ग निवडावा असे ट्विट केले आहे.

त्यांचे हे वक्तव्य महाराष्ट्राच्या जनतेला संभ्रमात टाकणारे असून लवकरच राजकारणात काही नवीन घडामोडी झालेल्या पाहायला मिळतील. इतकेच नव्हे तर भाजप-शिवसेनेनंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आपले राजकारण करतील असेही त्यांनी यात म्हटले आहे.

ANI चे ट्विट: 

हेदेखील वाचा- महाराष्ट्रात सत्ता स्थापनेचा तिढा सुटण्याची शक्यता, सोनिया गांधी आणि शरद पवार यांच्या बैठकीकडे जनतेचे लक्ष

तर दुसरीकडे आज शरद पवार(Sharad Pawar) आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांची आज महत्वपूर्ण बैठक पार पडणार आहे. त्यामुळे सर्व जनतेचे लक्ष या बैठकीवर लागले असून सत्ता स्थापनेची कोंडी फुटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही पक्षाच्या बैठकीनंतर नव्या सरकारबाबत निर्णय सुनावला जाईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून या तीन पक्षांच्या बैठका पार पडत आहेत. तर आज सोनिया गांधी आणि शरद पवार यांची आज बैठक पार पडणार असून सत्ता स्थापनेबाबत चर्चा केली जाणार आहे. त्याचसोबत तीन पक्षामध्ये सत्ता स्थापनेबाबत खातेवाटपाबाबत एक ड्राफ्ट सुद्धा तयार करण्यात आला आहे.