महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा उलथापालथ पाहायला मिळण्याची शक्यता आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि भाजप यांच्यात दुरावा निर्माण होण्याची चिन्हे आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्याची तयारी दर्शवली आहे. ते अनेक मुद्द्यांवर नाराज असल्याचे सांगितले जाते. गुरुवारी (08 जून) डोंबिवलीत भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक झाली, त्यात शिवसेनेवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आला. यामागे डोंबिवलीत एका भाजप पदाधिकाऱ्यावर त्यांच्याच पक्षाच्या महिला कार्यकर्तीकडे शरीरसुखाची मागणी केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामागे शिवसेनेतील शिंदे गटाचा हात असल्याचा आरोप करत भाजपने डोंबिवलीत मोर्चा काढला. तसेच यापुढे शिंदे गटाला सहकार्य करणार नसल्याचा ठराव स्थानिक कार्यकर्त्यांनी केला आहे. त्यावरुन आता शिवसेना आणि भाजपमध्ये वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
पहा व्हिडिओ
“… तर मी खासदारकीचा राजीनामा द्यायला तयार”;
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र आणि कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांचा भाजपला इशारा…
कल्याण लोकसभा कुणाची?; हा भाजप-शिंदेंच्या शिवसेनेतला वाद पेटला…. @DrSEShinde @mieknathshinde @BJP4Maharashtra @BJP4India pic.twitter.com/iaQfKHkWy1
— आशिष जाधव 🇮🇳 (@ashish_jadhao) June 9, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)