शिवसेनेशी दुरावा; आता मनसे सोबत करणार का भाजप युती? काय होणार नाशकात?
भाजप/मनसे (Photo Credit: Twitter/PTI)

शिवसेनेने भाजपकडे जेव्हापासून पाठ फिरवली आहे तेव्हापासून भाजपतील अनेक नेते सेनेवर टीका करताना दिसत आहेत. त्याचसोबत सेनेतीलही  काही नेते टीका करण्याच्या या शर्यतीत मागे नाहीत. अशा परिस्थितीत, भाजप एकटा पडल्याने यावेळी त्यांनी चक्क मनसेकडे मदत मागितली आहे.

नाशिक महापौरपदाच्या (Nashik Mayor Election) निवडणुकीत भाजपने मनसेकडे टाळी (BJP seeks help from MNS) मागितल्याची माहिती टीव्ही 9 या वृत्तवाहिनीने दिली आहे.

नाशिक महापौरपदाच्या निवडणुकीपूर्वी भाजप आणि मनसे यांची गुप्त बैठक पार पडली असल्याची माहिती त्यांनी दिली असून मनसेच्या राजगड कार्यालयावर ही बैठक घेण्यात आली.

भाजपला नाशिक महापालिकेत आपला महापौर बसवायचा आहे आणि नाशिक मध्ये मनसेचे एकूण 5 नगरसेवक असल्याने ते किंगमेकर ठरण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या आधी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपविरोधी भूमिका पत्करली होती. त्यांनी आपल्या प्रत्येक भाषणातून भाजपचाच केवळ विरोध केला होता आणि त्याचमुळे मनसे खरंच भाजप सोबत हात मिळवणी करणार का हे बघणं महत्त्वाचं ठरेल.

महाराष्ट्र राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना या 'महाशिवआघाडी' चा पहिला विजय; वाचा सविस्तर

तर दुसरीकडे कोल्हापुरात मात्र 'महाशिवआघाडी' म्हणजेच शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या आघाडीचा पहिला विजय पाहायला मिळाला. कारण शिवसेनेने तिथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नागरसेविकेला साथ दिली आहे.