BJP News State Incharge List: भाजपमध्ये संघटात्मक बदल, नाराजांना खूश करण्याचा प्रयत्न; विनोद तावडे हरियाणा राज्याचे प्रभारी, पंकजा मुंडे यांच्याकडे मध्य प्रदेशचे सहप्रभारीपद, पाहा संपूर्ण यादी
Pankaja Munde,Vinod Tawde | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

भारतीय जनता पक्षाचे (BJP) राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा (Jagat Prakash Nadda) यांनी भाजपमध्ये काही संघटनात्मक फेरबदल केले आहेत. त्यानुसार पक्षाच्या नव्या प्रभारींची यादी जाहीर करण्यात आली आहे. ही यादी पाहून भाजप नेतृत्वाने नाराजांना खूश करण्याचाच प्रयत्न केल्याचे अनेकांनी म्हटले आहे. या यादीत महाराष्ट्रातील काही नेत्यांचाही समावेश आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते विनोद तावडे (Vinod Tawde) , पंकजा मुंडे (Pankaja Munde) आणि सुनील देवधर (Sunil V. Deodhar) अशी या नेत्यांची नावे आहेत. विधानसभा आणि विधान परिषद निवडणुकीत तिकीट नाकारल्याने नाराज असलेल्या विनोद तावडे (Vinod Tawde) , पंकजा मुंडे (Pankaja Munde) दोन नेत्यांना राज्याच्या प्रभारी पदावर नेमल्याने त्यांचे पुनर्वसन करण्यात आल्याची चर्चा आहे.

पाहा कोणत्या नेत्याकडे कोणत्या राज्याची जबाबदारी?

  • तरुण चुग- जम्मू कश्मीर, लद्दाख, तेलंगाना
  • भूपेंद्र यादव -बिहार, गुजरात
  • संबित पात्रा- मणिपूर
  • कैलाश विजय वर्गीय- पश्चिम बंगाल के प्रभारी बने रहेंगे.
  • सत्या कुमार- अंडमान निकोबार
  • वी मुरलीधरन- आंध्र प्रदेश
  • दिलीप सैकिया- अरुणाचल प्रदेश,झारखंड
  • वैजयंत पांडा- दिल्ली, असम
  • दुष्यंत कुमार गौतम- चंडीगढ, पंजाब
  • डी पुरदेश्वरी- छत्तीसगढ, ओडिशा
  • विजया रहाटकर- दमन दीव
  • सीटी रवि- महाराष्ट्र,गोवा,तमिळनाडू
  • विनोद तावडे- हरियाणा
  • अविनाश राय खन्ना- हिमाचल प्रदेश
  • अरुण सिंह- कर्नाटक, राजस्थान
  • सीपी राधाकृष्णन- केरल,
  • अब्दुल्लाकुट्टी- लक्षद्वीप
  • पी मुरलीधर राव- मध्य प्रदेश
  • चूबा एओ- मेघायल
  • नलिन कोहली-नागालैंड

दरम्यान, महाराष्ट्रात एकनाथ खडसे यांनी भाजप सोडल्यानंर इतरही काही नेते पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त होते. तोपर्यंत पक्षाने वेळीच डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न केल्याचे पाहायला मिळत आहे. विनोद तावडे हे हरियाणा तर पंकजा मुंडे यांच्याकडे मध्य प्रदेश राज्याचे सहप्रभारीपद असणार आहे.