BJP MP Pritam Munde On Wrestlers’ Protest: 'सरकारनं कुस्तीपटूंशी संवाद साधायला हवा होता', भाजप खासदार प्रीतम मुंडे यांची खंत

प्रीतम मुंडे यांनी म्हटले आहे की, देशात लोकशाही आहे. देशातील कुस्तीपटून काही सांगू पाहात आहेत. खेळडूंच्या तक्रारींची दखल घेतली जात नसेल तर लोकशाहीमध्ये ते कधीच स्वागतार्ह नाही. केंद्र सरकारने दिल्लीतील कुस्तीगीरांच्या आंदोलनाकडे संपूर्ण दूर्लक्ष केल्याचे चित्र असताना प्रीतम मुंडे मात्र एकमेव खासदार आहेत. ज्यांनी केंद्र सरकारच्या भूमिकेवरच थेट भाष्य केले आहे.

Close
Search

महाराष्ट्र टीम लेटेस्टली|
BJP MP Pritam Munde On Wrestlers’ Protest: 'सरकारनं कुस्तीपटूंशी संवाद साधायला हवा होता', भाजप खासदार प्रीतम मुंडे यांची खंत
Pritam Munde | (File Image)

भाजप खासदार प्रीतम मुंडे (BJP MP Pritam Munde) यांनी केंद्र सरकारला घरचा आहेरी दिला आहे. सरकारच्या वतीने कुस्तीपटुंशी संवाद सादायला हवा होता. त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी कोणीच गेले नसल्याची खंत प्रीतम मुंडे यांनी व्यक्त केली आहे. देशाला आंतरराष्ट्रीय पातळीवर पदकं मिळवून देणाऱ्या कुस्तीपटुंनी दिल्ली येथे आंदोलन सुरु केले आहे. भारतीय कुस्ती महासंघाचे (Wrestling Federation of India) अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह (Brij Bhushan Sharan Singh) यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप झाले आहेत. बृजभूषण सिंह यांच्यावर कारवाई व्हावी, त्यांच्यावरील आरोपांची दखल घ्यावी, असे या कुस्तीपटूंचे म्हणने आहे. आपल्या मागण्या लावून धरत कुस्तीपटूंनी जोरदार आंदोलन सुरु केले आहे. केंद्र सरकारने मात्र, या आंदोलनाकडे साफ दूर्लक्ष केले आहे. त्यामुळे देशभरात संतापाची लाट आहे. दरम्यान, खासदार असलेल्या प्रीतम मुंडे या पहिल्याच खासदार आहेत. ज्यांनी आपल्याच पक्षाच्या सरकारवर भाष्य केल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत.

प्रीतम मुंडे यांनी म्हटले आहे की, देशात लोकशाही आहे. देशातील कुस्तीपटून काही सांगू पाहात आहेत. खेळडूंच्या तक्रारींची दखल घेतली जात नसेल तर लोकशाहीमध्ये ते कधीच स्वागतार्ह नाही. केंद्र सरकारने दिल्लीतील कुस्तीगीरांच्या आंदोलनाकडे संपूर्ण दूर्लक्ष केल्याचे चित्र असताना प्रीतम  मुंडे मात्र एकमेव खासदार आहेत. ज्यांनी केंद्र सरकारच्या भूमिकेवरच थेट भाष्य केले आहे. सरकारमधील कोणत्याही मंत्री, नेता अथवा सत्तापक्षाकडून कोणीच कुस्तीपटूंच्या आंदोलनाला पाठिंबा दिला नाही. साधी दखलही घेतली नाही. प्रीतम मुंडे या पहिल्याच खासदार आहेत. ज्यांनी कुस्तीपटूंना समर्थन दिले आहे. (हेही वाचा, Maharashtra Politics: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या बीड दौऱ्यात पंकजा मुंडेंची अनुपस्थिती, चर्चेला उधाण)

सरकारच्या वतीने कुस्तीपटूंशी संवाद साधायला कोणीच गेले नसल्याची थेट खंत प्रीतम मुंडे यांनी व्यक्त केली आहे. प्रीतम मुंडे यांची स्पष्ट भूमिका पाहून अनेकांनी भूवया उंचावल्या आहेत. दरम्यान, केंद्रातील मोदी सरकार स्वत:च्या खासदाराचे तरी ऐकणार का? याबाबत उत्सुकता आहे. प्रीतम मुंडे यांनी म्हटले आहे की, एक महिला म्हणून मला महिला खेळाडूंबद्दल आस्था आहे. सरकारने त्यांच्या तक्रारींची दखल घ्यायला हवी होती. मात्र, महिला खेळाडूंशी संवाद साधायला कोणीच गेले नाही, असेही प्रीतम मुंडे म्हणाल्या आहेत.

शहर पेट्रोल डीझल
कोल्हापूर 106.06 92.61
मुंबई 106.31 94.27
नागपूर 106.63 93.16
पुणे 106.42 92.92
View all
Currency Price Change