BJP MLA Suresh Dhas | (Archived and representative images)

BJP MLA Suresh Dhas controversial statement on Bihari womens: भाजप आमदार सुरेश धस यांनी जाहीर व्यासपीठावरून बिहारी समाजाबद्दल (Bihari Community) खळबळजनक विधान केले आहे. या विधानावरुन वाद निर्माण होण्याची चिन्हे आहेत. जाहीर व्यसपीठावरुन बोलताना धस यांची जीभ घसरली. बिहारी समुदायासंदर्भात बोलताना ते म्हणाले, 'बहारी लोक इकडे पेढे वाटतात. त्यांना विचारलं पेढे कशाचे? ते म्हणतात मुलगा झाला. कुठे तर तिकडे. म्हणजे बिहारी राहतात इकडे त्यांना पोरं होतात तिकडे. धस यांच्या या विधानाबद्दल उपस्थितांनी हसून दाद दिली. मात्र, त्यांचे हे विधान त्यांना वादाच्या भोवऱ्यात खेचण्याची शक्यता आहे. सुरेश धस हे भाजपकडून बीड (Beed ) येथून विधान परिषदेत (Legislative Council) नेतृत्व करतात.

भाजप आमदार आणि नेत्यांनी वादग्रस्त वक्तव्य करणे हे नवे नाही. अलिकडील काही काळात महाराष्ट्रातील भाजपचे नेतेही वादग्रस्त विधाने करण्यात आघाडी घेत असल्याचे दिसते. या आधी प्रशांत परिचारक यांनी पंढरपूर येथील जाहीर सभेत लष्कराच्या जवानांचा आणि त्यांच्या पत्नींचा वादग्रस्त विधान करुन अपमान केला होता. त्यांचेही विधान आमदार धस यांच्या विधानाशीच मिळतेजुळते होते. त्यामुळे परिचारक यांच्यावर काही काळ निलंबनाचीही कारवाई करण्यात आली होती. प्रशांत परिचारक हे भाजपचे भाजपाचे विधान परिषदेतील सहयोगी आमदार आहेत. (हेही वाचा, स्मृती इराणींचे वादग्रस्त विधान म्हणाल्या ''रक्ताने माखलेले सॅनिटरी पॅड्स मित्राच्या घरी घेऊन जाल?'')

दरम्यान, सुरेश धस, प्रशांत परिचारक यांच्याप्रमाणे श्रीपाद छिंदम या नेत्यानेही छत्रपती शिवरायांबद्दल अपशब्द काढले होते. धस, परिचारक यांच्या विधानापेक्षा छिंदम यांचे विधान वेगळे होते. वाद निर्माण झाल्यानंतर छिंदम याची पक्षातून हाकालपट्टी करण्यात आली होती.