Ram Kadam Aggressive On Tandav Web Series: 'तांडव' वेब सिरिजमध्ये हिंदू देवतांचा अपमान केल्याप्रकरणी भाजप आमदार राम कदम यांची घाटकोपर पोलिस ठाण्यात तक्रार
Ram Kadam (PC - ANI)

Ram Kadam Aggressive On Tandav Web Series: हिंदू देवतांचा अपमान केल्याच्या आरोपाखाली भाजपचे आमदार राम कदम (Ram Kadam) यांनी मुंबईतील घाटकोपर पोलिस स्टेशनमध्ये तांडव वेब सिरिज (Tandav Web Series) तयार करणार्‍यांविरोधात तक्रार दाखल केली आहे. यावेळी त्यांनी वेब सीरिजमधील अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माता यांच्याविरोधात कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली. बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान आणि डिंपल कपाडिया यांची वेब मालिका 'तांडव' शुक्रवारी प्रदर्शित झाली. या वेब सिरिजमुळे नवा वाद सुरू झाला आहे. राम कदम यांनी वेब सिरिजमधील अभिनेता सैफ अली खान ला लक्ष्य केलं आहे. या वेब सिरिजमुळे हिंदूंच्या भावना दुखावल्या जात असल्याचा राम कदम यांनी म्हटलं आहे.

याशिवाय भाजपचे खासदार मनोज कोटक यांनीही या वेबसिरिज विरोधात आक्षेप घेतला आहे. या वेबसिरिजमध्ये हिंदू विरोधी कंटेंट वापरण्यात आला आहे. त्यामुळे हिंदू देवदेवतांचा अपमान झाला आहे. त्यामुळे भाजप पक्षाकडून तांडव वेबसिरीज बॅन करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. मनोज कोटक यांनी सूचना आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांना यासंदर्भात पत्र लिहलं आहे. (वाचा - Ashish Shelar on Shiv Sena: 'उखाड दिया' ची भाषा करणारे सत्तेसाठी लाचार; आशिष शेलार यांची शिवसेनेवर टीका)

दरम्यान, राम कदम यांनी आपल्या ट्विटर हँडलवर लिहिलं आहे की, तांडव वेब सिरीज मालिकेमध्ये झालेल्या हिंदु देव देवतांच्या विटंबनेच्या संदर्भात हिंदूच्या दुखावलेल्या भावने विरोधात मी या वेब सिरीज च्या निर्माता, दिगर्दरशक, अभिनेता यांच्या विरोधात FRI दाखल करण्यासाठी घाटकोपर चिरागनगर पोलिस ठाणे येथे 12. 30 जाणार आहेत.

राम कदम यांनी सांगितलं की, दिग्दर्शक अली अब्बास जफरला भगवान शिवचा विनोद बनवणारा भाग मालिकांमधून काढून टाकावा लागेल. तसेच अभिनेता झीशान अयूबला माफी मागावी लागेल. आवश्यक बदल करेपर्यंत तांडव सिरिज बॅन करण्यात येईल.