Maratha Reservation: आता संघर्ष अटळ; मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालया कडून स्थगिती मिळाल्यानंतर नितेश राणे यांचं ट्विट
Nitesh Rane (Photo Credits: PTI)

मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीला काल (9 सप्टेंबर) सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर महाराष्ट्र सरकारला धक्का बसला आहे. यावर अनेक राजकीय नेत्यांनी आपली प्रतिक्रीया नोंदवली आहे. त्यानंतर आज भाजपा आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी 'या सरकारने मराठ्यांचा विश्वासघात केला' असं म्हटले आहे. यासाठी त्यांनी ट्विट करत 'आता संघर्ष अटळ' असं म्हणत सरकारला इशारा दिला आहे.

"या सरकारनी मराठयांचा विश्वासघात केला!! आज आमच्या समाजाच भविष्य अंधारात गेले.. कुठल्या तोंडानी या सरकारच्या मंत्र्यांना राज्यात फिरायला द्याच.. कश्यासाठी?? आता मूक मोर्चे नाहीच.. आता संघर्ष अटळ आहे!!" असे ट्विट नितेश राणे यांनी केले आहे. (SC Stays Maratha Reservation: मराठा समाजासाठी आज काळा दिवस: भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील)

NItesh Rane Tweet:

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर सध्या नोकरी किंवा शिक्षणासाठी मराठा आरक्षण लागू होणार नाही. 2020-21 या वर्षासाठी प्रवेश प्रक्रियेतून मराठा आरक्षण वगळण्यात आलं आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी हा निकाल धक्कादायक आणि अनपेक्षित असल्याचे म्हटले आहे. तर मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्य सरकार गंभीर नसल्याची टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. तर मराठा समाजासाठी निकालाचा दिवस हा काळा दिवस असल्याचे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. तर या प्रकरणात सरकारने चांगले वकील दिले नसल्याची टीका भाजपा खासदार नारायण राणे यांनी म्हटले आहे.

महाराष्ट्रात डिसेंबर 2018 मध्ये मराठा आरक्षण विधेयक लागू झालं होतं. ओबीसी समाजाला कोणताही धक्का न लावता एसईबीसी या विशेष प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण देण्यात आलं होतं. मराठा आरक्षणात मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीत 16% आरक्षण देण्यात आलं होतं.