Coronavirus: जळगाव जिल्ह्यातील दोन आमदारांना कोरोना विषाणूची (Coronavirus) लागण झाली आहे. चाळीसगाव येथील भाजपचे आमदार मंगेश चव्हाण (BJP MLA Mangesh Chavan) आणि पाचोरा-भडगावचे शिवसेना आमदार किशोर पाटील (Shiv Sena MLA Kishore Patil) यांना करोना विषाणूची लागण झाली आहे. यासंदर्भात दोन्ही आमदारांनी माहिती दिली आहे. सध्या त्यांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे.
दरम्यान, मंगेश चव्हाण यांना कोरोना विषाणूची लक्षणं जाणवत असल्याने त्यांनी स्वत:ची कोरोना चाचणी करून घेतली. त्यानंतर त्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्यांना घरातचं क्वारंटाईन करण्यात आलं आहे. उद्या चव्हाण यांचा वाढदिवस आहे. मात्र कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांनी वाढदिवस साजरा करू नये, असं आवाहनदेखील मंगेश चव्हाण यांनी केलं आहे. (हेही वाचा - Coronavirus Update: कोरोना व्हायरस रिकव्हरी मध्ये उल्हासनगर देशात प्रथम, दिल्ली दुसर्या स्थानी)
याशिवाय पाचोरा-भडगावचे आमदार किशोर पाटील यांचीदेखील कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. किशोर पाटील यांना कोरोनाची सौम्य लक्षण जाणवत होती. त्यामुळे त्यांनी स्वत: ची कोरोना चाचणी करून घेतली. यात त्यांचा कोरोना रिपोर्ट सकारात्म आला आहे. पाटील यांनी यासंदर्भात आपल्या सोशल मीडियावर माहिती दिली आहे. किशोर पाटील यांनादेखील घरात क्वारंटाईन करण्यात आलं आहे.