Brahmanand Padalkar (PC - Facebook)

Brahmanand Padalkar Accident: भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichnd padalkar) यांचे थोरले बंधू, सांगली जिल्हा परिषद सदस्य ब्रम्हानंद पडळकर (Brahmanand Padalkar) यांच्या गाडीचा अपघात झाला आहे. या अपघातात ब्रम्हानंद पडळकरांसह तिघेजण गंभीर जखमी आहेत. कार्यकर्त्याच्या मुलीच्या साखरपुड्यासाठी जात असताना विटा-कुंडल मार्गावर मालवाहू वाहन आणि ब्रम्हानंद पडळकरांच्या गाडीमध्ये समोरासमोर धडक झाली. सध्या अपघातात जखमी झालेल्यांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या अपघातात ब्रम्हानंद पडळकर यांच्या गाडीच्या समोरील भागाचे मोठे नुकसान झाले आहे. याशिवाय समोर धडक देणाऱ्या पिकअप गाडीचा समोरील भाग चक्काचूर झाला आहे. या अपघातात ब्रम्हानंद पडळकर जखमी झाले आहेत. (हेही वाचा - Sanjay Raut Tweet: किरीट सोमय्या आणि त्यांचा मुलगा मिल्खा सिंगपेक्षाही जोरात पळत आहेत, संजय राऊतांचे ट्विट चर्चेत)

प्राप्त माहितीनुसार, या अपघातात ब्रह्मानंद पडळकर यांच्या कार चालकासह तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. ब्रम्हानंद पडळकर यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याशिवाय अपघातग्रस्त पिकअप गाडीचा ड्रायव्हरही गंभीर जखमी झाला आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अपघातानंतर जखमींना विट्याच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताची बातमी कळताच सातारा जिल्हा दौऱ्यावर असणारे आमदार गोपीचंद पडळकर हे आपला साताराचा दौरा सोडून विट्याकडे रवाना झाले आहेत. या अपघातामुळे जिल्ह्यातील विटा-कुंडल रोडवर वाहतूक बऱ्याच वेळ विस्कळीत झाली होती.