खळबळजनक! 'भाजप नेत्यांचे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आमदारांना फोन'; महाराष्ट्रात सत्तासंघर्ष शिगेला
Jayant Patil, Vijay Wadettiwar | (Photo Credit: Archived, edited, representative images)

सत्तास्थापनेसाठी भाजप नेत्यांकडून फोडाफोडीचे राजकारण करण्याचा प्रयत्न केला जातो आहे. त्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आमदारांना भाजप नेते फोन करत असल्याचा खळबळजनक आरोप काँग्रेस (Congress) नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) आणि राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केला आहे. मात्र हा आरप करतानाच भाजपने कितीही प्रयत्न केले तरी आमचे आमदार फुटणार नाहीत, असा विश्वासही या दोन्ही नेत्यांनी व्यक्त केला आहे. शिवसेना-भाजप (Shiv Sena-BJP) यांच्यात सत्तासंघर्ष निर्माण झाल्याने महाराष्ट्रात सत्तास्थापनेचा पेच निर्माण झाला आहे. या पेचामुळे राज्यावर राष्ट्रपती राजवटीची टांगती तलवार टकत असल्याची भावना राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, भाजपने फोडाफोडीचं राजकारण केलं आणि काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आमदारांना पुन्हा निवडूण आणण्याचा प्रयत्न केला तर, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेसह इतर पक्ष हा प्रयत्न हाणून पाडतील, असे जयंत पाटील यांनी या आधीच स्पष्ट केले आहे. येत्या शुक्रवारी म्हणजेच 9 नोव्हेंबर रोजी विद्यमान सरकारचा कार्यकाळ समाप्त होत आहे. घटनात्मक तरतुदीनुसार शुक्रवारपूर्वी नवे सरकार अस्तित्वात येणे आवश्यक आहे. मात्र, भाजप-शिवसेना यांच्यातील सत्तासंघर्ष महाराष्ट्राला सत्तास्थापनेपासून दूर ठेवत आहे. अशा वेळी कोणाचे सरकार अस्तित्वात येणार याबाब प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. (हेही वाचा, Maharashtra Government Formation: पुढील 48 तासात हे असू शकतात सरकार स्थापनेचे 5 फॉर्म्युले; वाचा सविस्तर)

जयंत पाटील यांनी भाजपवर आरोप करताना म्हटले आहे की, भाजपकडून आमच्या आमदारांना सत्तेची आणि त्यासोबतच विविध प्रकारची प्रलोभनं दाखवली जात आहेत. मात्र, या प्रलोभनांचा काहीही फायदा होणार नाही. आमचा एकही आमदार फुटणार नाही. जे फुटाफुटी व्हायची आहे ती या आधीच झाली आहे. आमचे जे नवे चेहरे निवडूण आले आहेत हे चेहरे जनतेच्या विश्वासास पात्र ठरल्यानेच निवडूण आले आहेत. त्यामुळे ते फुटाफुीच्या राजाकारणाचा भाग होणार नाहीत, असे जयंत पाटील यांनी म्हटले आहे.

'मी पुन्हा येईन..मी पुन्हा येईन' असे मोठ्या आत्मविश्वासाने सांगणाऱ्यांना जनादेश असतानाही सरकार बनवता येत नाही. त्यामुळेच विरोधी पक्षातील आमदार फुटण्याच्या बातम्या पेरण्यात येत असल्याचा टोला पाटील यांनी भाजपला लगावला आहे. पण, या वेळी फोडाफोडीचे राजकारण करण्याचा या वेळी भाजपला फायदा होणार नाही.