Samadhan Autade, Bhagirath Bhalke (PC - facebook)

Samadhan Autade Wins Pandharpur Election 2021: पंढरपूर मंगळवेढा पोटनिवडणुकीची मतमोजणी आज सकाळी आठ वाजल्यापासून पंढरपूर येथील शासकीय गोदामात सुरु झाली आहे. राष्ट्रवादीचे दिवंगत आमदार भारत भालके यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेसाठी पोटनिवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीत भाजपचे उमेदवार समाधान आवताडे (Samadhan Autade) यांनी बाजी मारली आहे. तर राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके (Bhagirath Bhalke) यांचा पराभव झाला असून राष्ट्रवादी नेते अजित पवार (Ajit Pawar) यांना मोठा धक्का बसला आहे. या निवडणुकीत भाजपचे उमेदवार समाधान आवताडे यांचा विजय झाला असून त्यांनी 36व्या फेरीनंतर 4103 मतांची आघाडी घेतली.

पंढरपूर मंगळवेढा पोटनिवडणूक अतिशय अटीतटीची झाल्याने शेवटच्या फेरीपर्यंत मतमोजणीत काट्याची टक्कर होती. या निवडणुकीत एकूण 2 लाख 24 हजार 68 मतदारांनी मतदान केले होते. तसेच 80 वर्षावरील व दिव्यांग आदी 3252 मतदारांनी पोस्टाने मतदान केले. याशिवाय 73 सैनिकांनी देखील पोस्टाने आपला मतदानाचा हक्क बजावला होता. (वाचा - Belgaum By Election Results 2021 Live News Updates: पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत 4,394 मतांनी भाजपचे समाधान आवताडे आघाडीवर; मंगला अंगडी पिछाडीवर)

एक्झिट पोलनुसार समाधान आवताडे हे 3438 मताधिक्य घेऊन विजयी होणार असल्याचं म्हटलं जात होतं. पंढरपूरचं देवस्थान आणि पंढरपूरमधील राजकीय घडामोडींमुळे हा मतदारसंघ कायम चर्चेत असतो. मंगळवेढा-पंढरपूर मतदारसंघात एकूण 22 गावे आहेत. महाराष्ट्रात राष्ट्रवादीचे सर्वाधिक वर्चस्व आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने पश्चिम महाराष्ट्रात वर्चस्व निर्माण करण्याची संधी भाजपला मिळाली आहे.