 
                                                                 महाराष्ट्रात शिवसेना, काँग्रेस-राष्ट्रवादी तिन्ही पक्षाने एकत्र येऊन महाविकास आघाडीचे (Maha Vikas Aghadi) सरकार स्थापन केले आहे. यावरुन विरोधीपक्षातील नेत्यांकडून वारंवार ठाकरे सरकारवर टीका केली जात आहे. याचत भाजप (BJP) नेते रावसाहेब दानवे (Ravsaheb Danve) यांनीही यात भर घातली आहे. तुमचा अमर, अकबर, ऍंथनीचा संसार चांगला व्यवस्थितपणे चालवा असा टोला दानवे यांनी लगावला आहे. जालना येथे राष्ट्रवादीचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या सर्वपक्षीय नागरिक सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी ते म्हणाले आहेत.
महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून विरोधीपक्षीतील अनेक नेत्यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. तसेच तीन सरकार जास्त टिकणार नसल्याची टीका माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यानी केली होती. यानंतर रावसाहेब दानवे यांनीही एका कार्यक्रमात महाविकास आघाडीच्या सरकारवर जोरदार टीका केली आहे. तुमचा अमर, अकबर, ऍंथनीचा संसार चांगला चालवा, अन्यथा अर्ध्यावरच डाव मोडला असे म्हणण्याची संधी आम्हाला देऊ नका, अशा शब्दात रावसाहेब दानवे यांनी महाविकास आघाडीवर टीकास्त्र सोडले आहे. तसेच चित्रपट, राजकारण आणि क्रिकेटमध्ये आपल्या संधी मिळाली असे प्रत्येकाला वाटत असते. चित्रपट आणि क्रिकेट मध्ये रिटेक करता येतो. मात्र, राजकारणात असे होत नाही, असेही दानवे म्हणाले आहेत. हे देखील वाचा- मला दुचाकीची सवय नाही; मात्र, 3 चाकी सरकार चालवतो आहे– मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून एकमेकांवर टीका सुरू झाली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर केलेल्या टीकेवर आज मुख्यमंत्री यांनी आपल्या प्रत्युत्तर दिले आहे. “आमच्यावर 3 चाकी सरकार असल्याची टीका होत आहे. तीनचाकी तर तीनचाकी…पण आमचे सरकार चालत आहे ना हे महत्त्वाचे आहे. दोन चाक असो किंवा तीन चाक असो समतोल जमला पाहिजे. असे उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.
 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                     
                     QuickLY
                                                                                QuickLY
                                     Socially
                                                                                Socially
                                     
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                     
                     
                     
                     
                                 
                                 
                                 
                                 
                                 
                                
