मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह (Param Bir Singh) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रानंतर राज्यात राजकीय भूकंप झाला आहे. भाजप नेते व पक्षाचे प्रवक्ते राम कदम (Ram Kadam) यांनीही शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या ट्विटवर शायराना अंदाजात टीका केली आहे. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आणि गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या नार्को टेस्टची (Narco Test) मागणी करत त्यांनी वसुलीतील वाटाबाबतही प्रश्न उपस्थित केला आहे. संजय राऊत यांनी गीतकार जावेद अख्तर यांच्या कविता ट्वीट केली आहे. या ट्विटमध्ये त्यांनी लिहिलं की, "हमको तो बस तलाश नए रास्तो की है, हम हैं मुसाफिर ऐसे जो मंजिल से आए है.” संजय राऊत यांचे हे ट्विट राम कदम यांनी रिट्विट केलं असून त्यांनी शायरीच्या अंदाजात महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे.
राऊत यांच्या ट्विटवर राम कदम यांनी लिहिलं आहे की, ''मेरे टूटे हुए दिल से कोई तो आज ये पूछे के तेरा हाल क्या है के तेरा हाल क्या है मेरे टूटे... किस्मत तेरी रीत निराली, ओ छलिये को छलने वाली फूल खिला तो टूटी डाली जिसे उलफ़त समझ बैठा, क्यूं मेरी नज़रों का धोखा था किसी की क्या खता है मेरे टूटे... माँगी मुहब्बत पाई जुदाई, दुनिया मुझको रास न आई, पहले कदम पर ठोकर खाई, सदा आज़ाद रहते थे हमें मालूम ही क्या था मुहब्बत क्या बला है मेरे टूटे... #MahaVasooliAghadi '' (वाचा - परमबीर सिंह लेटर प्रकरणी शरद पवार-अनिल देशमुख यांच्यात फोनवरुन चर्चा)
मेरे टूटे हुए दिल से कोई तो आज ये पूछे के तेरा हाल क्या है
के तेरा हाल क्या है मेरे टूटे... किस्मत तेरी रीत निराली,
ओ छलिये को छलने वाली फूल खिला तो टूटी डाली जिसे उलफ़त समझ बैठा,
Qमेरी नज़रों का धोखा था किसी की क्या खता है मेरे टूटे...
माँगी मुहब्बत पाई जुदाई, दुनिया मुझको https://t.co/8tAi2JAuhS
— Ram Kadam - राम कदम (@ramkadam) March 21, 2021
भाजप नेते राम कदम यांनी याप्रकरणी एकामागून एक अनेक ट्विट केले आहेत. त्यांनी मुख्यमंत्र्यांनी आणि गृहमंत्र्यांनी स्वत: ची नार्को टेस्ट करून राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे. सरकार यापुढे अग्निपरीक्षेपासून वाचू शकत नाही. स्वतंत्र भारताच्या इतिहासात मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र आणि मुंबई पोलिसांची प्रतिमा धूळीत मिसळली आहे.
राम कदम यांनी दुसऱ्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, तेथे हिस्सेदारी होती का? हे कधी सांगणार? मोठा उद्योगपती यापुढे महाराष्ट्रात सुरक्षित नाही. आता येणाऱ्या काळात महाराष्ट्रात नवीन उद्योग आणण्याचे धाडस कुठल्या उद्योगपतीला शक्य होईल काय? दुर्दैवाने याच उत्तर नाही असं आहे. या सरकारने कोट्यवधी गरीबांचे रोजगार काढून घेतले आहेत.
#मंदिरों से पहले #बियरबार खोलने की जल्दबाजी का कारण आज सभी को पत्ता चल गया
देश के संतों साधुओं का मांग , तथा #पालघर के संतों की किलकारियाँ चीख दुर्भाग्य से आप सुन पाते तो यह दिन नहीं आते , संतों के श्राप से कोई बच नहीं पाता
ईश्वरीय न्याय से कोई बच नहीं सकता #MahaVasooliAghadi
— Ram Kadam - राम कदम (@ramkadam) March 21, 2021
मंदिरांपूर्वी बिअर बार उघडण्याची घाई करण्याचे कारण आज सर्वांना माहिती पडलं. दुर्दैवाने, जर तुम्हाला देशातील संताची मागणी आणि पालघरच्या संतांची ओरड ऐकू येत नसेल, तर तुम्ही कोणीही संतांच्या शापातून सुटू शकणार नाही. दैवी न्यायापासून कोणीही सुटू शकत नाही.
दरम्यान, परमबीर सिंह यांनी उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. देशमुख यांनी सचिन वाझे यांना दरमहा 100 कोटी रुपये जमा करण्यास सांगितले होते, असा आरोप परमबीर सिंह यांनी पत्राद्वारे केला आहे. मात्र, अनिल देशमुख यांनी परमबीर सिंग यांचा हा आरोप फेटाळून लावला आहे. त्याचवेळी विरोधकांनी ठाकरे सरकारला याप्रकरणी कोंडीत पकडले आहे. मनसे आणि भाजपने अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. यासह या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचीही मागणी करण्यात आली आहे.