Nilesh Rane & CM Uddhav Thackeray (Photo Credits: Facebook)

शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त (Shiv Sena Faundation Day) संपू्र्ण महाराष्ट्रात (Maharashtra) जागोजागी बॅनर लावण्यात आले आहेत. याचदरम्यान, भाजपा नेते निलेश राणे (Nilesh Rane) यांनी शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेल्या बॅनरवरून शिवसेनेवर खोचक शब्दांमध्ये टीका केली आहे. तसेच, शिवसेनेचे स्थानिक आमदार वैभव नाईक (Vaibhav Naik) यांच्यावर देखील त्यांनी शेलक्या शब्दांमध्ये निशाणा साधला आहे. निलेश राणे यांच्या टीकेवर शिवसेनेकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

“शिवसेनेचा वर्धापन दिनाचा बॅनर पण शिवसेना आमदार नाईकसारखा निघाला. एका तासात उलटा झाला. शिवसेना पक्षाची हालत पण या बॅनरसारखीच झाली आहे. वाईट वाटतं स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंसाठी. त्यांनी पक्षाची सुरुवात केली वाघांना घेऊन. संपणार कुत्र्यांमुळे”, अशा आशायचे ट्वीट निलेश राणे यांनी केले आहे. हे देखील वाचा- Maharashtra: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची स्वबळाच्या घोषणेवरुन काँग्रेसवर अप्रत्यक्षरित्या टीका

ट्वीट-

 

शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी एका पेट्रोल पंपावर मोफत पेट्रोल वाटायला सुरुवात केली होती. हा प्रकार लक्षात आल्यानंतर राणेसमर्थक भाजपा कार्यकर्ते तिथे पोहोचले. दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची सुरू झाली. यावेळी आमदार वैभव नाईक देखील त्यामध्ये पडल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, स्थानिक पोलिसांनी मध्यस्ती केल्यानंतर तेथील परिस्थिती नियंत्रणात आली होती. मात्र, त्यानंतर सोशल मीडियावर शिवसेना आणि भाजप यांच्यात शाब्दिक युद्ध सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे.