
शिवसेना (Shiv Sena) उपनेत्याच्या मुलाची ड्रग्ज प्रकरणी पोलिसांकडून चौकशी, असे वृत्त एका वृत्तपत्रात छापून आले आहे. त्या वृत्तपत्रातील वृत्ताच्या आधारावर भाजप नेते (BJP) निलेश राणे (Nilesh Rane) यांनी ट्विटरच्या माध्यामातून शिवसेनेवर निशाणा साधला आहे. एकेकाळी शिवसेनेची काय ओळख होती? अन् आता ड्रग्ज व्यापारी, खंडणी मागणारे, मर्डर केस अशी आजची शिवसेनेची ओळख आहे. मराठी म्हण आहे, अति तिथे माती'...शिवसेनेचा अंत जवळ आला आहे, अशा शब्दात निलेश राणे यांनी शिवसेनेवर शाब्दिक हल्ला चढवला आहे. निलेश राणे यांच्या टीकेला अद्याप शिवसेनेकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आली नाही.
मीटरचोर खासदार विनायक राऊत याची गल्लीत आणि शिवसेनेत काडीची किंमत नसल्यामुळे जगामध्ये कोणालाच किंमत नाही असे त्याला वाटते. शिवसेनेचे पहिल्या क्रमांकाचे नेते ह्याला हड तुड करतात आणि दरवाज्यावर पण उभा करत नाही. माझ्यावर विनायकचा राग मी समजू शकतो कारण मला त्याची खरी लायकी माहिती आहे, असेही निलेश राणे ट्विटरच्या माध्यमातून म्हणाले आहेत. देखील वाचा- Sharad Pawar Total Assets According ADR : शरद पवार यांची एकूण संपत्ती किती? आयकर विभागाच्या नोटीशीनंतर चर्चेला उधान, पाहा काय सांगतो एडीआर आकडेवारी
निलेश राणे यांचे ट्विट-
काय ओळख होती शिवसेनेची आणि आता काय झाली आहे. बलात्कारी, ड्रग्स व्यापारी, खंडणी मागणारे, मर्डर केस, चमडी केस ही ओळख आजच्या शिवसेनेची. मराठीमध्ये म्हण आहे ‘अति तिथे माती‘... शिवसेनेचा अंत जवळ आलाय. pic.twitter.com/iJ9GfTAJM0
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) September 24, 2020
निशांत देशमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मावशी चा मुलगा. निशांतची कंपनी सुगी डेव्हलपर्स याने राजापूर नाणार प्रकल्पाच्या बाधित जमिनीत शेतकऱ्यांबरोबर 1 हजार 400 एकर चे व्यवहार केले. शिवसेनेच्या विरोधाचा बुरखा फाटला आहे, कालच्या पत्रकार परिषदेमध्ये पुराव्यानिशी विषय मांडले, असेही निलेश राणे म्हणाले आहेत.