नारायण राणे (फोटो सौजन्य-ट्वीटर)

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा (Sushant Singh Rajput Death Case) तपास सीबीआयकडे (CBI) देण्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाने घेतला. याव्यतिरिक्त या प्रकरणातील सर्व पुरावे सीबीआयला सोपवण्याचे व तपासात सहकार्य करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने मुंबई पोलिसांना दिले आहेत. याचत भाजप खासदार नारायण राणे (Narayan Rane) यांनीही यामुद्द्यावर आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय हा जनतेच्या मनातील आहे. हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात यावी, हे अपेक्षित होते. यामुळे सामानाचे संपादक तोंडावरपडले आहेत, अशी टीका नारायण राणे यांनी शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांचे नाव न घेता केली आहे.

सुप्रीम कोर्टाने SSR केस CBIकडे दिल्यापासून महाराष्ट्र सरकारची धावपळ जोरात सुरू झाली. आज दिवसभरामध्ये बांद्रा डीसीपी आणि मुंबई कमिशनर मुख्यमंत्र्यांना का भेटले हे विचार करण्यासारखे आहे. एका केस साठी मुख्यमंत्री कार्यालयाची इतकी धावपळ का आणि कोणासाठी? हे वेगळे सांगायची गरज नाही. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचा राजीनामा मागितला पाहिजे. आंधळा आणि भैरा पण सांगेल की मुंबई पोलिसांवर मागच्या 65 दिवसात कोण दबाव टाकत होते. एवढा दबाव फक्त मुख्यमंत्री कार्यालय टाकू शकते म्हणून राजीनामा पण मुख्यमंत्र्यांनीच दिला पाहिजे, असेही नारायण राणे म्हणाले आहेत. हे देखील वाचा-MP Supriya Sule Demand To Reopen Gyms: राज्यातील व्यायाम शाळा पुन्हा सुरु करावी; राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी

याआधी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली होती. यावर संजय राऊत यांनी आपली तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. राजीनाम्याची बाब पुढे आली तर ती दिल्लीपर्यंत जाईल. नेहमी सत्य आणि न्यायाचा विजय झाला आहे. महाराष्ट्रात कायद्याचे राज्य चालते. तसेच सुशांत सिंह मृत्यूप्रकरणी मुंबई पोलीस योग्य तपास करत होती. कायद्यापेक्षा कोणीच मोठे नाही. सध्या जे आरोप केले जात आहेत ते योग्य नाहीत, असेही संजय राऊत म्हणाले आहेत.