Kirit Somaiya, Uddhav Thackeray & Nilesh Rane (Photo Credits: Facebook & IANS)

राज्यात सध्या वाढीव वीज बिलावरुन राजकारण चांगलंच तापलं आहे. कोविड-19 लॉकडाऊन काळात आलेल्या भरमसाठ वीज बिलातून सामान्यांना दिलासा देण्याची मागणी वारंवार होत होती. मात्र ऊर्जामंत्री नितीन राऊत (Nitin Raut) यांनी सर्वसामान्यांना यातून मुक्तता मिळणार नसल्याचे स्पष्ट केले. यावरुन राज्य सरकारविरुद्ध विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे. भाजप नेते (BJP Leader) किरीट सोमय्या (Kirit Somaiya) आणि निलेश राणे (Nilesh Rane) यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. 'माझे लाईट बील, माझी जबाबदारी' ही सरकारची पुढील योजना असल्याचे किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे. तर ठाकरे सरकारला आता झटका देण्याची वेळ आली असल्याचे निलेश राणे यांनी म्हटले आहे.

किरीट सोमय्या यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले की, "एका पत्रकाराने लिहिले आहे, "माझे कुटुंब माझी जवाबदारी" चा यशानंतर ठाकरे सरकार ची नवीन योजना "माझे लाईट बिल माझी जवाबदारी."

किरीट सोमय्या ट्विट:

निलेश राणे यांनी ट्विटमध्ये म्हटले की, "ठाकरे सरकारला झटका देण्याची वेळ आली आहे. देशातले एकमेव राज्य सरकार असेल ज्यांनी लोकांसाठी सरकारी तिजोरीतील एक दमडीचा फायदा थेट लोकांपर्यंत पोचवला नाही. सगळं जर-तर, किंतु-परंतु आणि सर्वात शेवटी कोमट पाणी प्या आणि स्वतःची स्वतःचं काळजी घ्या."

निलेश राणे ट्विट:

दरम्यान, वाढीव वीज बिलाच्या मुद्द्यावरुन मनसे देखील आक्रमक पवित्रा घेतला आहे. सोमवारपर्यंत वीज बिल माफ न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दिला आहे. तर वीज बिलात सवलत न देण्यात निर्णय म्हणजे नागरिकांचा विश्वासघात असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. (Maharashtra: राज्यातील वीज ग्राहकांना झटका! वाढीव बिलातून दिलासा मिळणार नसल्याचे उर्जामंत्री नितीन राऊत यांचे स्पष्टीकरण)

कोविड-19 संकटात इतर समस्यांसोबतच वाढीव वीज बिलाची समस्या सर्वसामान्यांसमोर उभी राहिली. यातून सवलत देण्याचे जाहीर केल्यानंतर आता राज्य सरकारने यातून यु-टर्न घेतला आहे. काही दिवसांपूर्वी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी वाढीव वीज बिलातून सर्वसामान्यांना दिलासा देता येणार नसल्याचे स्पष्ट केले.