महाराष्ट्रात महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) सरकारला एक वर्ष पूर्ण झाले आहे. या कार्यकाळात राज्य सरकार सर्वच स्तरावर अपयशी ठरले आहे, अशी टीका विरोधकांकडून वारंवार केली जात आहे. याचदरम्यान, हिंदुत्वाच्या मुद्यावरून शिवसेना (Shiv Sena) आणि भाजप (BJP) यांच्यात चांगलेच शाब्दिक युद्ध सुरु झाले आहे. याच मुद्यावरून विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fandnavis) यांनी शिवसेनेवर पुन्हा एकदा जोरदार टीका केली आहे. "शिवसेनेने आता हिंदुत्व सोडले आहे, आता ती सुडो सेक्युलर झाली आहे. तेसच शिवसेना आता हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष राहिला नाही," असेही फडणवीस म्हणाले आहेत.
दक्षिण मुंबईतील शिवसेनेचे विभागप्रमुख पांडुरुंग सकपाळ यांनी अजना स्पर्धा आयोजित केली होती. त्यानंतर भाजपच्या अनेक नेत्यांनी शिवसेनेच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले. आता यावरच देवेंद्र फडणवीस यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. "शिवसेना आता मत मिळवण्यासाठी राजकारण करत आहे. त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांची विचारधारा नाकारली आहे. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर बाळासाहेब ठाकरे कायमच बोलत राहिले आणि लढत राहिले. बाळासाहेब ठाकरेंनी सामनात लिहिलेल्या लेखांच्या अगदी उलट भूमिका आता शिवसेनेने घेतली आहे. शिवसेना हा पक्ष आता बाळासाहेब ठाकरेंचा राहिला नाही," असे फडणवीस म्हणाले आहेत. हे देखील वाचा- Urmila Matondkar Joins Shiv Sena: अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांचा 'मातोश्री' वर शिवसेना पक्षामध्ये प्रवेश
देवेंद्र फडणवीस यांचे ट्विट-
ShivSena has became pseudo-secular !
My interaction with @indiatvnews today.https://t.co/eoRa2K63dX pic.twitter.com/n33nJA4zpS
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) December 1, 2020
दरम्यान, शिवसेनेचे हिंदुत्व भाजपाच्या हिंदुत्वापेक्षा वेगळे असल्याची भूमिका शिवसेनेचे युवा नेते आणि मंत्री आदित्य ठाकरे यांनी मांडली होती. “आमचे हिंदुत्व भाजपाच्या हिंदुत्वापेक्षा निराळे आहे. प्रत्येकाचा आदर करा, सन्मान करा. कर्म हीच आस्था आहे. हेच माझे हिंदुत्व आहे,” अशा शब्दात आदित्य ठाकरे भाजपला उत्तर दिले होते.