Nana Patole यांचं पुन्हा वादग्रस्त विधान, भाजप आक्रमक; नाना पटोलेंना कॉंग्रेसप्रदेशाध्यक्ष पदावरून बरखास्त करण्याची Chandrashekhar Bawankhule यांचं Sonia Gandhi ना पत्र
Nana Patole | (Photo Credits: twitter)

कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) पुन्हा चर्चेमध्ये आले आहेत. काही दिवसांपूर्वी 'मोदी' यांच्यावरून आक्षेपार्ह विधान करत भाजपाच्या रडार वर आलेले पटोले काल महात्मा गांधीजींच्या पुण्यतिथी निमित्त कार्यक्रमामध्ये बोलताना देखील एका वाक्यावरून पुन्हा भाजपाच्या टीकेचे लक्ष्य बनले आहेत. दरम्यान काल 30 जानेवारी अर्थात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची पुण्यतिथी होती. त्यानिमित्त कार्यक्रमात “आजच्याच दिवशी महात्मा गांधींचा वध नथुराम गोडसेने केला” असं वादग्रस्त विधान त्यांनी केले आहे. यावरून भाजपा आमदार चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankhule)  यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांना पत्र पाठवलं आहे.

बावनकुळे यांच्या पत्रामध्ये “भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नाना पटोले वारंवार समाजविघातक वक्तव्य करून सामाजिक शांतता भंग करत आहेत. आपल्या पक्षासोबत आमचे राजकीय आणि वैचारिक मतभेद असले तरी राष्ट्राचे हित जिथे असते तिथे सर्व प्रकारचे मतभेद विसरून आपण एकत्र यावे हा आपल्या समृद्ध लोकशाहीचा संस्कार आहे. त्याच भावनेतून आपणास हे पत्र लिहीत आहे.” असे त्यांनी म्हटलं आहे.

कॉंग्रेस पक्षाने नेहमीच महात्मा गांधींचा वध अशा शब्दप्रयोगाला आक्षेप घेतलेला आहे. पण आता कॉंग्रेस महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीच त्याचा वापर केल्याने यावरून अजून राजकारण पेटण्याची शक्यता आहे. हे देखील नक्की वाचा: Why I killed Gandhi: 'व्हाय आय किल्ड गांधी' चित्रपटावर राज्यात बंदी घालावी, नाना पटोलेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र .

Nana Patole यांनी काही दिवसांपूर्वी  'मी मोदीला मारू शकतो, शिव्याही देऊ शकतो' अशा आक्षेपार्ह विधानाची क्लिप सोशल मीडीयात वायरल झाली होती. भाजपाकडून व्हीडिओवर स्पष्टीकरण देत  म्हणाले,' मी गावगुंडाबाबत बोलत होतो'. याबाबत ट्वीटर वर खुलासा करत त्यांनी  'माझ्या मतदारसंघातील मोदी नावाच्या स्थानिक गुंडाबाबत नागरिकांनी माझ्याकडे तक्रारी केल्या असता मी त्यांच्याशी बोलतानाचा व्हिडीओ खोडसाळपणे सोशल मीडियावर व्हायरल केला जात आहे. मी पुन्हा स्पष्ट करतो मी तिथे पंतप्रधान मोदींबद्दल नाही,तर मोदी नावाच्या स्थानिक गुंडाबाबत बोलत होतो.' असं स्पष्टीकरण देण्यात आलं होतं.