महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून महिला अत्याचार आणि बलात्काराचे सत्र सुरुच आहे. राज्यातील विविध कोपऱ्यातून हृदय पिळवटून टाकणाऱ्या बातम्या सतत कानावर पडत आहेत. यातच देशाची आर्थिक राजधानी मुंबईत (Mumbai) 'निर्भया'सारखी हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. मुंबईच्या साकीनाका (Sakinaka) परिसरात एका 30 वर्षीय महिलेवर बलात्कार (Rape) करून नराधमाने तिच्या गुप्तांगात लोखंडी रॉड घातल्याचा अमानुष प्रकार समोर आला आहे. या घटनेनंतर संपूर्ण राज्यातून संतापजनक प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. याचप्रकरणावरून भाजपने (BJP) राज्य सरकारवर (Maharashtra Government) टीका केली आहे.
महाराष्ट्र भाजपने केलेल्या ट्विटमध्ये असे म्हटले आहे की, राज्यात सातत्याने सुरू असलेल्या बलात्काराच्या घटना सुन्न करणाऱ्या आहेत. सुरक्षेचे तीन तेरा वाजल्याने महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. राज्य सरकारने 'वसुली' ऐवजी महिलांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राथमिकता द्यावी आणि संबंधित घटनांमधील आरोपींवर तातडीने कठोर कारवाई करावी, अशीही मागणी त्यांनी केली आहे. हे देखील वाचा- Maharashtra Sadan Case: महाराष्ट्र सदन घोटाळ्यातून निर्दोष मुक्त झाल्यानंतर मंत्री छगन भुजबळ यांची भाजपवर टीका
ट्वीट-
राज्यात सातत्याने सुरू असलेल्या बलात्काराच्या घटना सुन्न करणाऱ्या आहेत. सुरक्षेचे तीन तेरा वाजल्याने महिलांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. राज्य सरकारने 'वसुली'ऐवजी महिलांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राथमिकता द्यावी आणि संबंधित घटनांमधील आरोपींवर तातडीने कठोर कारवाई करावी. pic.twitter.com/4BFM9HtozQ
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) September 10, 2021
पुणे स्टेशन परिसरातील गुरुवारी (9 सप्टेंबर) एका अल्पवयीन मुलीच्या बलात्काराची घटना समोर आली होती. पुण्यातील 39 वर्षाच्या रिक्षा चालकाने या 6 वर्षीय चिमुकलीचे अपहरण करुन तिच्यावर बलात्कार केला होता. तर, आज (10 सप्टेंबर) मुंबईच्या साकीनाका परिसरात एका व्यक्तीने 30 वर्षीय महिलेवर बलात्कार करून तिच्यासोबत अमानुष कृत्य केले आहे. या दोन बातमींची स्क्रीन शॉर्ट काढून भाजपने ट्विटरवर शेअर केले आहे.