अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याबद्दल वादग्रस्त ट्विट केल्यामुळे शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी राहुल गांधी यांच्या विरोधात वादग्रस्त विधान केले होते. या विधानाच्या आधारावर अमृता फडणवीस यांनीही ट्विटरच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधण्याचा प्रयत्न केला. परंतु, अमृता फडणवीस यांचे ट्विट पाहून शिवसैनिक अधिकच तापले आहेत. यामुळे शिवसैनिकांनी देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस यांचा जाहिर निषेध केला आहे. यावर अमृता फडणवीस यांनी पुन्हा ट्विटरच्या माध्यमातून शिवसैनिकांना प्रत्यूत्तर दिले आहे.

भाजप-शिवसेना महायुतीने महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत महायुतीला अधिक जागा मिळाल्या तरीदेखील मुख्यमंत्रीपदावरुन दोन्ही पक्षात वाद पेटला होता. यानंतर शिवसेना, काँग्रेस- राष्ट्रवादी तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन महाराष्ट्रात महायुतीचे सरकार स्थापन केले आहे. यामुळे विरोधीपक्षांकडून महाविकास आघाडीवर बोट केले जात आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी वीर सावरकर यांच्याबदल केलेल्या विधानाला महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यांनी प्रत्यूत्तर दिले होते. केवळ अडनाव गांधी असल्याने कोणी गांधी होत नाही असे फडणवीस त्यावेळी म्हणाले होते. यातच अमृता फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्याबदल वादग्रस्त विधान करुन सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. आपल्या नावाच्या शेवटी ठाकरे अडनाव लावण्याने कोण ठाकरे होत नाही, असे विधान अमृता फडणवीस यांनी केले होते. यामुळे शिवसैनिक आक्रमक झाले असून त्यांनी अमृता फडणवीस यांच्या विरोधात जाहीर निषेध केला आहे. हे देखील वाचा- शशिकांत शिंदे होणार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नवे प्रदेशाध्यक्ष?

अमृता फडणवीस यांचे ट्वीट-

दरम्यान, अमृता फडणवीस यांनी शायरीच्या माध्यमातून अंदोलनकर्त्यांवर निशाणा साधला आहे. दिखाओ चप्पल, फेको पत्थर, ये तो शौक़ हैं पुराना आपका, हम तो वो शक़्स हैं की धुप में भी निखर आएँगे ! असे ट्वीट अमृता फडणवीस यांनी केले आहे. परंतु, यात अमृता फडणवीस यांनी कोणत्याही पक्षाचा उल्लेख केला नाही.