बर्ड फ्लू (फोटो सौजन्य- फेसबुक)

Bird Flu in Palghar: महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यात असणाऱ्या एका पोल्ट्री फार्ममधील जवळजवळ 45 कोंबड्यांचा बर्ड फ्लू मुळे मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर ANI यांनी दिलेल्या माहितीनुसार, पालघरचे उपजिल्हाधिकारी किरण महाजन यांनी बर्ड फ्लू मुळे पोल्ट्रीसह चिकन विक्री करणाऱ्या दुकानांना सुचना दिल्या आहेत. त्यामुळे आता पुढील 21 दिवस पोल्ट्री आणि चिकन विक्री करण्यात येणाऱ्या दुकानांना आता मांस विक्री करता येणार नाही आहे.(दिलासादायक! Bird Flu मुळे नुकसान होणाऱ्या पोल्ट्री व्यावसायिकांना शासनाकडून मदतीचा हात; अंडी व पक्षीखाद्याच्या नुकसान भरपाईसाठी 1.30 कोटी मंजूर)

किरण महाजन यांनी पुढे असे ही म्हटले आहे की, पोल्ट्रीसह चिकन शॉप्स पुढील 21 दिवस बंद करण्यासह त्यांनी त्याची विक्री करु नये.(Russia: काय सांगता? माणसांमध्ये आढळला Bird Flu; जगातील पहिल्या घटनेची रशियामध्ये नोंद)

Tweet:

तर महाराष्ट्रात रविवार पर्यंत बर्ड फ्लू मुळे 381 पक्षांचा मृत्यू झाल्याची माहिती सरकारच्या अधिकाऱ्यांनी दिल्याचे PTI ने म्हटले आहे. त्यांनी पुढे असे म्हटले आहे की, 380 पक्ष्यांमधील 190 हे नंदूरबार आणि 115 हे विदर्भातील अमरावती मधील आहेत. मृत पक्षांचे नमुने बर्ड फ्लू चे आहेत का यासाठी ते NIHSAD भोपाल आणि डिझिस इन्वेस्टिगेशन सेक्शन पुणे येथे पाठवण्यात आले आहेत.

आतापर्यंत 7,20,515 पोल्ट्री मधील 5,86,668 नागपूर येथील कोंबड्या पुरण्यात आल्या आहेत. तसेच26,44,177 अंडी आणि 73,004 किलोचे पोल्ट्री मधील खाद्य नष्ट करण्यात आले आहे. बर्ड फ्लू चा प्रादुर्भाव आजूबाजूच्या ठिकाणी पसरु नये म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याचे सरकारने याआधीच्या पत्रकात म्हटले आहे. तसेच पोल्ट्री व्यवसायिकांना सरकारकडून 3.38 कोटी रुपयांनी मदत सुद्धा केली गेली आहे.