Rohit Pawar On BEST Bus Transport: T20 वर्ल्ड चॅम्पियन भारतीय संघातील मुंबईच्या चार खेळाडूंचा शुक्रवारी महाराष्ट्र विधान भवन संकुलात गौरव करण्यात येणार आहे. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी गुरुवारी सभागृहात ही माहिती दिली. कर्णधार रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे आणि यशस्वी जैस्वाल हे भारताच्या T20 विश्वचषक (T20 World Cup) संघाचा भाग होते. हे सर्वजण मुंबईचे रहिवासी आहेत. दरम्यान, आज मुंबईतही विजयी परेडचे आयोजन करण्यात आले आहे. नरिमन पॉइंट ते वानखेडे स्टेडियम असा रोड शो आयोजित करण्यात आला असून त्यानंतर वानखेडे स्टेडियमवर त्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे. यावर आता राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांचे मोठे वक्तव्य समोर आले आहे.
रोहित पवार यांनी म्हटलं आहे की, 'आमचे खेळाडू चांगले खेळले. आम्ही विश्वचषक जिंकला. पण, जर विश्वचषक विजयाच्या परेडसाठी महाराष्ट्रात येत असेल, तर 'बेस्ट' बसचा वापर करावा. कारण 'बेस्ट'शी आम्ही भावनिकरित्या जोडलेले आहोत. परेडसाठी मोठी बस वापरण्याऐवजी 'बेस्ट बस' वापरावी. कारण लोक भावनिकरित्या जोडलेले आहेत.' (हेही वाचा -Indian Cricket Team Victory Parade: 'मरीन ड्राईव्हकडे जाणे टाळा'; भारतीय क्रिकेट संघाच्या विजय परेडच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांचे नागरिकांना आवाहन)
शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांनी एएनआयला सांगितले की, भारताचा कर्णधार रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे आणि यशस्वी जैस्वाल शुक्रवारी विधानसभेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत. हे सर्व मुंबईचे खेळाडू आहेत. तथापी, मुंबईत आजचा कार्यक्रम बीसीसीआयने आयोजित केला आहे. कॅप्टन रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे आणि यशस्वी जैस्वाल यांच्यासह टीम इंडियाचे मुंबईतील खेळाडू उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी महाराष्ट्र विधानसभेत येणार आहेत. एमसीएचा सदस्य असल्याने मी खेळाडूंना आमंत्रित केले आणि त्यांनी माझे निमंत्रण स्वीकारले, असे सरनाईक यांनी सांगितलं आहे.
"Emotionally connected...": NCP-SCP leader Rohit Pawar suggests to use 'BEST' Bus Transport for Team India's victory parade
Read @ANI Story | https://t.co/kCq9YNgEB3#RohitPawar #India #BEST #NCP #PratapSarnaik pic.twitter.com/aGPpxRItdd
— ANI Digital (@ani_digital) July 4, 2024
मुंबई क्रिकेट असोसिएशनचे (एमसीए) सचिव अजिंक्य नाईक यांनी सांगितले की, भारतीय संघाच्या विजयाचा आनंद साजरा करणाऱ्या विजय परेडसाठी लोकांना विनामूल्य प्रवेश असेल. भारताने शनिवारी दक्षिण आफ्रिकेचा सात धावांनी पराभव करत अंतिम सामन्यात विजयासह 13 वर्षांचा आयसीसी विश्वचषक ट्रॉफीचा दुष्काळ संपवला. विराट कोहलीच्या 76 धावांमुळे भारताला 176/7 पर्यंत पोहोचता आले तर हार्दिक पंड्या (3/20) आणि जसप्रीत बुमराह (2/18) यांनी हेनरिक क्लासेनच्या 27 चेंडूत 52 धावा करूनही भारताला विजय मिळवून दिला.