Indian Cricket Team Victory Parade: 'मरीन ड्राईव्हकडे जाणे टाळा'; भारतीय क्रिकेट संघाच्या विजय परेडच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांचे नागरिकांना आवाहन

मुंबईच्या नरिमन पॉइंट ते वानखेडे स्टेडियमपर्यंत ओपनडेक बसमध्ये भारतीय संघाची विजयी मिरवणुक निघणार आहे. या कार्यक्रमासाठी खेळाडू विमानतळावरून मरीन ड्राईव्हकडे मार्गस्थ झाले आहेत.

Indian Cricket Team Victory Parade: 'मरीन ड्राईव्हकडे जाणे टाळा'; भारतीय क्रिकेट संघाच्या विजय परेडच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांचे नागरिकांना आवाहन
मरीन ड्राईव्ह

Indian Cricket Team Victory Parade: टी-20 विश्वचषक 2024 चे विजेतेपद पटकावल्यानंतर भारतीय क्रिकेट संघ दिल्लीहून मुंबईत पोहोचला आहे. मुंबईच्या नरिमन पॉइंट ते वानखेडे स्टेडियमपर्यंत ओपनडेक बसमध्ये भारतीय संघाची विजयी मिरवणुक निघणार आहे. या कार्यक्रमासाठी खेळाडू विमानतळावरून मरीन ड्राईव्हकडे मार्गस्थ झाले आहेत. मरीन ड्राईव्हवर खेळाडूंचे जंगी स्वागत करण्यासाठी लाखोंच्या संख्येने एकत्र आले आहेत. मरीन ड्राईव्हवर तुफान गर्दी पाहायला मिळत आहे. अशात मुंबई पोलिसांनी मरीन ड्राईव्हकडे प्रवास करणे टाळण्याचा सल्ला दिला आहे. मुंबई पोलीस म्हणतात, ‘भारतीय क्रिकेट संघाच्या विजय यात्रेसाठी वानखेडे स्टेडियम व आजूबाजूला परिसरात चाहत्यांची प्रचंड गर्दी झाली असून, नागरिकांना विनंती आहे की त्यांनी मरीन ड्राईव्हच्या दिशेने जाणे टाळावे.’ (हेही वाचा: Team India's Flight Gets Water Salute At Airport: विमानतळावर उतरताच टीम इंडियाच्या फ्लाइटला देण्यात आलं वॉटर सॅल्युट, पाहा व्हिडिओ)

पहा पोस्ट-

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jul 04, 2024 06:48 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).