नर्गिस दत्त नगर भागात भीषण आग Photo Credit : Twiiter

वांद्रे भागात आज नर्गिस दत्त नगर भागात भीषण आग लागली आहे. अली यावर यंग या हॉस्पिटलचया समोर असणार्‍या परिसरात आग लागली आहे. या आगीमध्ये जीवितहानी झालेली नाही. वांद्रे रेल्वे स्थानकापासून अवघ्या काही मीटरवर ही झोपडपट्टी आहे. सोशल मीडियामध्ये काही फोटो आणि व्हिडिओ शेअर करण्यात आले आहे. वांद्रेमध्ये नर्गिस दत्त नगर भागात लागलेल्या आगीचं कारण अजून समजू शकलेलं नाही.

अग्निशमन दलाच्या 10-12 गाड्या या भागात पोहचल्या आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले. वांद्रे रेक्लमेशन भागात धूराचे लोट परिसरात पसरले आहेत. त्यामुळे नजीकच्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.

नक्की वाचा : ' माझ्या नवर्‍याची बायको..' मालिकेवरून अग्निशमन दलाच्या कर्मचार्‍यांमध्ये वाद, लोखंडी रॉडने मारहाण

2017 साली वांद्रे पूर्व भागात आग लागली होती, त्यावेळेस गॅस सिलेंडरचा स्फोट झाला होता. महानगरपालिका या भागात झोपडपट्ट्या हटवण्याचं कम सुरू असताना हा गॅस सिलेंडरचा स्फोट झाला आहे.