SSC Board Exam 2019: भिवंडीत दहावी बोर्ड परिक्षेच्या पेपरफुटी प्रकरणी आणखी एका शिक्षकाला अटक
प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

SSC Board Exam 2019: भिवंडी (Bhiwandi) येथे दहावी बोर्ड परिक्षेच्या पेपरफुटी प्रकरणी  आणखी एका शिक्षकाला अटक करण्यात आली आहे. तर मोहम्मद-अन्सारी असे या शिक्षकाचे नाव आहे. तर यंदासुद्धा पेपरफुटीची प्रकरणे थांबण्याचे नाव घेत नाही आहे.

मोहम्मद हा शेख वाजीर रेहमान या व्यक्तीसोबत खासगी शिकवणी घेत होता. तर काही दिवसांपूर्वीच इतिहासाची प्रश्नपत्रिका परिक्षेच्या 1 तास अगोदर व्हॉट्सअॅपवर व्हायरल झाली असल्याची घटना घडली होती. तसेच त्यावेळी विज्ञानचा पेपर सुद्धा व्हायरल झाला होता. या प्रकरणी पोलिसांनी भिवंडी येथील खासगी शिकवणी चालकाला अटकेसह अन्य दोघांनासुद्धा अटक केली होती. यामध्ये एका शाळेच्या उपमुख्यध्यापकाचा सुद्धा हात असल्याचे समोर आले होते.(हेही वाचा-SSC Board Exam 2019: विज्ञान-1 नंतर दहावी परीक्षेचा इतिहास विषयाचा पेपर व्हॉटसअ‍ॅपवर फुटला; भिवंडीतील शिकवणी चालकाला अटक)

मात्र रविवारी पुन्हा अन्सारी नावाच्या आणखी एका शिक्षकाला अटक करण्यात आली आहे. या पेपरफुटी प्रकरणी आता आरोपींचा आकडा चारवर पोहचला आहे.