भिवंडी येथे गोदामाला भीषण आग, अग्निशमन दलाकडून बचाव कार्य सुरु
Fire Breaking Out in Bhiwandi (Photo Credits-ANI)

मुंबईतील भिवंडी परिसरातील एका गोदामाला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी अग्निशमन दलाचा ताफा घटनास्थळी पोहचला असून बचाव कार्य सुरु करण्यात आले आहे. तसेच आगीवर नियंत्रण आणण्याचे शर्थीचे प्रयत्न अग्निशमन दलाकडून केले जात आहे. मात्र आग नेमक्या कोणत्या कारणामुळे लागली हे स्पष्ट झालेले नाही.तर मुंबईत गेल्या काही महिन्यांपासून आगी लागण्याचे प्रकारात अधिकाधिक वाढ झाल्याचे दिसून आले आहे. यामुळे ज्या ठिकाणी आग लागल्याची घटना घडते त्यांचे मोठ्या प्रमाणात आतापर्यंत नुकसान झालेले आहे.

यापूर्वी सुद्धा भिवंडीत जुलै महिन्यात एका गोदामाला आग लागल्याची घटना घडली होती. त्यावेळी घटनास्थळी अग्निशमन दलाच्या 4 गाड्या रवाना करण्यात आल्या होत्या. तर आगीमुळे गोदामाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले.

ANI Tweet:

तर गेल्या महिन्यात डोंबिवली मधील एमआयडीसी परिसरातील प्रसिद्ध क्लासिक हॉटेलजवळ असलेल्या पेरोक्सि केम कंपनीत भीषण आग लागल्याची घटना घडली होती. यामध्ये कोणचाही सुदैवाने मृत झाला नाही. परंतु आगीचे लोट एवढे मोठे होते की परिसरात धुरामुळे वातावरण बिघडल्याची परिस्थिती निर्माण झाली होती.