Bhima Koregaon case: Pune Police files a 1,837 page charge-sheet against Sudha Bharadwaj, Varavara Rao, Arun Ferreira, Vernon Gonsalves and wanted accused Ganapathy (File Image)

Bhima Koregaon case: कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणात पुणे पोलिसांनी (Pune Police) तब्बल 1,837 पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. या आरोपपत्रात सूधा भारद्वाज (Sudha Bharadwaj), वरावरा राव ( Varavara Rao), अरुण फरेरा (Arun Ferreira), वर्नोन गोन्साल्वीस (Vernon Gonsalves) यांच्यासह CPI(M)चा माजी जनरल सेक्रेटरी गणपतेय (Ganapathy) यांच्या नावाचाही समावेश आहे. पुणे येते एल्गार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेच्या आयोजनानंतर कोरेगाव भीमा येथे हिंसाचार घडला होता. तसेच, हा हिंसाचार घडवून आणण्यामागे मोओद्यांचा हात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

सूधा भारद्वाज, वरावरा राव, अरुण फरेरा, वर्नोन गोन्साल्वीस यांना कोरेगाव भीमा हिंसाचार घटनेनंतर पुणे पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर या सर्व मंडळींना नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. (हेही वाचा, कोरेगाव भीमा येथे जाऊन, पुण्यात सभा घेणारच; चंद्रशेखर आझाद यांचा निर्धार)

कोरेगाव भीमा प्रकरणामुळे महाराष्ट्रातील राजकीय, सामाजिक वातावरण ढवळून निघाले. या घटनेचे राजकारण करत मोठ्या प्रमाणावर राजकीय आरोप प्रत्यारोप झाले. 1 जानेवारी 2018 या दिवशी कोरेगाव भीमा येथे एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. इतिसाहास प्रसिद्ध असलेल्या कोरेगाव भीमा लढाईच्या विजयाला 200 वर्षे पूर्ण झाल्याच्या स्मृतिप्रित्यार्थ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मात्र, त्याला हिंसक वळण लागले आणि मोठा हिंसाचार उफाळला.