Photo Credit- X

Prakash Ambedkar: कोरेगाव भीमा येथे 207 व्या शौर्य दिनानिमित्त (Koregaon Bhima Shaurya Din) विजयस्थंभाला अभिवादन करण्यासाठी देशभरातून मोठ्या प्रमाणात भीम अनुयायी मोठ्या प्रमाणात दाखल झाले आहे. . 'भीमा-कोरेगाव शौर्य दिवस हा आपल्या पूर्वजांच्या जातीय अत्याचाराविरुद्धच्या लढ्यात एक पाऊल पुढे टाकण्याची आठवण आहे. 500 (499 महार आणि 1 मातंग) सैनिक आणि अलुतेदार सैन्याने ब्राह्मणवादी पेशव्यांच्या शासकांवर केलेल्या विजयापासून प्रेरणा घ्या. त्यांच्या पराक्रमाची सकारात्मक आठवण ठेवा आणि बाबासाहेबांना जे हवे होते तेच स्वतंत्र आंबेडकरी राजकीय आकांक्षेचे प्रतीक म्हणून वापरा. आज जयस्तंभाला भेट द्याल तेव्हा सैनिकांचा सन्मान करा आणि बाबासाहेबांच्या आकांक्षा आणि महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी आपले मत द्या - एक स्वतंत्र आंबेडकरवादी राजकीय शक्ती.', असे प्रकाश आंबेडकर यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.

207 वा शौर्य दिन

रात्रीपासून मोठ्या संख्येने नागरिकांच्या रांगा लागल्या आहे. कोणाचीही गैर सोय होऊ नये यासाठी मोफत बससेवा, आरोग्य सेवा, स्तनदा मातांसाठी हिरकणी कक्ष, ज्येष्ठांसाठी निवारा कक्ष, शौचालय सुविधा, पिण्याचे पाणी, पोलीस मदत कक्ष, वाहनतळ आदी सुविधा उभारण्यात आल्या आहेत. कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी विशेष अधिकारी व 17 समन्वय अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत.