Arrest (PC -Pixabay)

आजकाल प्रार्थनास्थळांवरही चोरीमारी सहज केली जाते अशा अनेक घटना समोर आल्या आहेत. भाईंदर (Bhayander) मध्ये एका जैन मंदिरात (Jain Mandir) 12 ग्रॅम सोने चोरणार्‍या व्यक्तिला पोलिसांनी अटक केली आहे. भाईंदर पश्चिमेला असलेल्या 90 फीट रोड वर असलेल्या बालाजी कॉम्प्लेक्स मध्ये जैन मंदिरातील एका देवतेचं सोनं लंपास करण्यात आलं होतं. याप्रकरणी आरोपी नरेश जैन याला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी त्याला दक्षिण मुंबईतील मरीन लाईन्स स्टेशन वर बेड्या ठोकल्या आहेत. आरोपीला दोन दिवसाची पोलिस कोठडी ठोठावण्यात आली आहे.

सोनं चोरण्याच्या याप्रकरणी एलटी मार्ग पोलिस स्टेशन व नवघर येथे चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेपूर्वी जैन यांनी वेगवेगळ्या ठिकाणाहून चोरीचा प्रयत्न केला होता, मात्र तो यशस्वी झाला नाही. त्यानंतर त्याने इतरत्र अवैध धंदे सुरू केले होते. भाईंदर मधील मंदिरातील सोने घेऊन तो फरार झाला. नक्की वाचा: ठाणे: राम मंदिरात चोरी; सव्वा लाखाच्या दागिने, रोकड गायब.

चोरीची माहिती मिळताच भाईंदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांनी गुन्ह्याच्या घटनास्थळाचा नीट कसून तपास केला आणि भाईंदर रेल्वे स्टेशन, बोरिवली, अंधेरी, मरीन लाईन्स येथील सीसीटीव्ही कॅमेरा फुटेज स्कॅन केले, शेवटी आरोपीला त्याच्या मरीन लाइन्स येथील निवासस्थानी शोधून अटक केली.