Rahul Gandhi In Maharashtra | Photo Credits: Archived, edited, symbolic images)

Latest Marathi News: राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची भारत जोडो न्याय यात्रा (Bharat Jodo Nyay Yatra) महाराष्ट्रात दाखल झाल्यानंतर पहिलीच सभा नांदेड येथे झाली. या सभेला काँग्रेस पक्षाचे नेते, कार्यकर्ते आणि सामान्य नागरिकही उपस्थित होते. ही यात्रा आता अंतिम टप्प्यात असून मुंबई येथे तिचा समारोप होणार आहे. यात्रेची सांगता करताना राहुल गांधी मुंबई येथील शिवाजी पार्क (Shivaji Park) मैदानावर जाहीर सभा घेणार आहेत. मैदानाची एकूण क्षमता पाहता ही सभा ऐतिहासिक होणार हे जवळपास निश्चित आहे. दरम्यान, राज्यातील आणि देशातील एकूण राजकीय स्थिती, तोंडावर आलेल्या लोकसभा निवडणुका या पार्श्वभूमीवर या सभेसाठी शरद पवार, उद्धव ठाकरे उपस्थित राहणार का? याबाबत उत्सुकता आहे.

राहुल गांधी यांची शिवाजी पार्क मैदानावरील सभा कधी?

प्राप्त माहिती आणि यात्रेचे वेळापत्रक पाहता राहुल गांधी यांची शिवाजी पार्क मैदानावरील सभा येत्या 17 मार्च रोजी पार पडणार आहे. शिवाजी पार्क मैदानाची क्षमता पाहता आजवर दिवंगत बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्या सारखे नेते पाहता हे मैदान पूर्ण क्षमतेने भरणे हे काहीच नेत्यांना जमले आहे. दरम्यान, सध्या महाविकासआघाडीचा घटक असलेल्या शिवसेना (ubt) पक्षाचे नेते उद्धव ठाकरे आणि हे मैदान यांचं वेगळं नातं राहिलं आहे. त्यामुळे राहुल गांधी यांच्या सभेसाठी ते या मैदानात उपस्थित राहणार का? याबाबत उत्सुकता आहे. अर्थात या सभेसाठी काँग्रेस पक्षाकडून विविध नेत्यांना आणि राजकीय पक्ष, संघटनांनाही निमंत्रण देण्यात आले आहे. (हेही वाचा, Rahul Gandhi Bharat Jodo Nyay Yatra: भारत जोडो न्याय यात्रा महाराष्ट्रात दाखल, राहुल गांधी आक्रमक; काँग्रेस पक्षाचे धोरण स्पष्ट)

यात्रेचे अंतिम टप्प्यातील वेळापत्रक

13 मार्च

8:30 AM ते 11:30 PM - दोंडाईचा ते धुळे

11:30: महिला मेळावा12.30महिला मवालुंच, धुळे

2:00 PM ते 5:00 PM - धुळे ते मालेगाव

रात्रीता मुक्काम: सौंदाणे

14 मार्च

8:30 AM ते 12:00 PM - सौंदाणे ते ओझर मार्गे चांदवड

9:30 AM शेतकरी मेळावा : चांदवड येथे भोजन (ओझर)

2:00 PM ते 5:00 PM - ओझर-नाशिक-त्र्यंबकेश्वर

रात्रीचा मुक्काम: मोखाडा

15 मार्च

सकाळी 8:30 ते दुपारी 12:00 - मोखाडा-जव्हार- विक्रमगड-वाडा

वाडा येथे दुपारचे भोजन

2:00 ते 5:00 PM - वाडा-भिवंडी-भिवंडी बायपास रात्रीचा मुक्काम: भिवंडी बायपास

16 मार्च

सकाळी 8:30 ते दुपारी 12:00 - ठाणे

दुपारचे भोजन- मुलुंड

दुपारी 2:00 ते 5:00 PM - मुलुंड ते दादर

रात्रीचा मुक्काम: मुंबई

17 मार्च

मुंबई येथे जाहीर सभा

शिवाजी पार्क मैदानावरील सभेसाठी काँग्रेस पक्षाकडून शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांना निमंत्रण देण्यात आले आहे. या सभेच्या निमित्ताने काँग्रेस आणि महाविकासआघाडी पर्यायान इंडिया आघाडी शक्तीप्रदर्शन करण्याची शक्यता आहे. दरम्यान, सभेच्या आदल्या दिवशी म्हणजेच 16 मार्च रोजी राहुल गांधी भारत जोडो न्याय यात्रेसह दादर येथील चैत्यभूमीवर पोहोचतील. या ठिकाणी शरद पवार हे देखील उपस्थित राहतील, असे समजते. त्यानंतर उद्धव ठाकरे हे 17 मार्च रोजी शिवाजी पार्क येथे पार पडणाऱ्या सभेसाठी उपस्थित राहतील असे समजते.