नागरिकत्व दुरूस्ती कायदा (CAA) आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणी (NRC) विरोधात आज बहुजन क्रांती मोर्चातर्फे (Bahujan Kranti Morcha) भारत बंदची (Bharat Bandh) हाक देण्यात आली होती. या बंदला संपूर्ण महाराष्ट्रातून (Maharashtra) उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. दरम्यान, सांगली (Sangli), भुसावळ (Bhusawal) आणि धुळे (Dhule) जिल्ह्यात या अंदोलनाला हिंसक वळण मिळाले होते. सांगली येथील रिक्षा वाहतूक करणाऱ्या रिक्षाची तोडफोड करण्यात आली होते. एवढेच नव्हेतर, सांगलीत जबरदस्तीने दुकाने बंद करण्यात आले. यामुळे अंदोलक आणि व्यापाऱ्यांमध्ये बाचाबाची झाली. याशिवाय भुसावळ येथे एका हॉटेलवर दगडफेक करण्यात आले तर, धुळ्यात 100 फुटी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात दगडफेक करुन जाळपोळ करण्यात आली.
नागरिकत्व दुरूस्ती कायदा संपूर्ण भारतात लागू झाला असून अजूनही या कायद्याच्याविरोधात अनेक राज्यातून विरोध दर्शवला जात आहे. नागरिकत्व कायदा रद्द करावा, यासाठी कित्येक अंदोलने केली जात आहे. यातच बहुजन क्रांती मोर्चातर्फे आज संपूर्ण महाराष्ट्रात भारत बंदची हाक देण्यात आली होती. बुधवारी सकाळपासून संपूर्ण महाराष्ट्रात भारत बंद पाळण्यात आला होता. दरम्यान, राज्यातील काही भागात भारत बंदला हिंसक वळण मिळाले आहेत. सांगलीत अंदोलक आणि व्यापाऱ्यांमध्ये चांगलीच जुंपली. सांगलीत गेल्या वर्षी महापूर आला होता. तसेच महापूरातून सावरत असताना बंद कशासाठी असा प्रश्न व्यापाऱ्यांनी विचारला. परंतु, जबरदस्तीने दुकाने बंद करत असल्याने अंदोलक आणि व्यापाऱ्यांमध्ये बाचाबाची झाली. दरम्यान, पोलिसांनी काही जणांना ताब्यात घेतले आहे. हे देखील वाचा- Bharat Bandh: यवतमाळ येथे CAA,NRC आणि NPR चा विरोध करणाऱ्या कार्यकर्त्यांकडून दुकान बंदचा प्रयत्न, मालकाकडून मिर्ची पूडची उधळण (Video)
मध्य रेल्वे येथे कांजूरमार्ग रल्वे स्थानकात बहुजन क्रांती मोर्च्याच्या कार्यकरत्यांनी रेल रोको केला. घटनास्थळी रेल्वे सुरक्षा बल आणि लोहमार्ग पोलिसांनी आंदोलकाना बाजूला करून लोकल सेवा पुन्हा सुरु केली होती. यामुळे मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर काही प्रमाणात परिणाम झाला. दरम्यान, वाहतूक 21 मिनिटे ठप्प झाली होती.