भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील (Bhandara Hospital Fire) नवजात बालकांच्या अतिदक्षता कक्षात शनिवारी पहाटे दोनच्या सुमारास आग लागली होती. ज्यात दहा बालकांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेमुळे राज्यासह अवघा देश हळहळला होता.दरम्यान, महाविकास आघाडी सरकार या दुर्घटनेला जबाबदार असल्याचा दावा करत भाजपच्या अनेक नेत्यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. तसेच या दुर्घटनेनंतर भाजपच्या वतीने आज भंडारा बंद पाळण्यात येत असून त्यांनी राज्य सरकारकडे तीन महत्वाच्या मागण्या केल्या आहेत, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) ट्विटरच्या माध्यामातून म्हंटले आहे.
प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे भंडारा सामान्य रूग्णालयात 10 निष्पाप बालकांचा नाहक जीव गेला आहे. अद्याप सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला नाही, त्यामुळे कठोर कारवाईच्या मागणीसाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज भंडारा बंद पाळण्यात येत आहे. तसेच मृतांच्या कुटुंबीयांना 10 लाख रूपये देण्यात यावे आणि भंडारा सामान्य रूग्णालयाच्या अद्ययावतीकरणासाठी राज्य सरकारने तत्काळ आराखड्याला मंजुरी द्यावी, यासुद्धा आमच्या प्रमुख मागण्या आहेत. राज्य सरकारने तत्काळ या तिन्ही मागण्या मान्य कराव्यात आहे, अशा आशयाचे देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट केले आहे. हे देखील वाचा- Bhandara Hospital Fire: तीन मृत मुलांनंतर जन्माला आली होती गोंडस चिमुकली; भंडारा रुग्णालयात लागलेल्या आगीत दाम्पत्याने तिलाही गमावलं
देवेंद्र फडणवीस यांचे ट्विट-
प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे भंडारा सामान्य रूग्णालयात 10 निष्पाप बालकांचा नाहक जीव गेला.
अद्याप सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला नाही, त्यामुळे कठोर कारवाईच्या मागणीसाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज भंडारा बंद पाळण्यात येत आहे.#BhandaraHospitalfire #Bhandara pic.twitter.com/xfElb5uJa9
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) January 11, 2021
या दुर्घटनाप्रकरणी मृत बालकांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 2 लाख रुपये मदत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केली आहे. तर, या घटनेत जे गंभीररित्या जखमी झाले आहेत त्यांना 50 हजार रुपयांची मदत केली जाणार आहे. पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून ही मदत दिली जाणार आहे. यासंदर्भात पंतप्रधान कार्यालयाने माहिती दिली आहे.