कर्नाटकच्या बेळगाव पोटनिवडणुकीत भाजपची उमेदवार मंगला अंगडी विजयी झाली आहे. मंगला अंगडी (Mangala Angadi), यांनी कॉंग्रेसचे उमेदवार सतीश जारकिहोळी (Satish Jarkiholi) यांचा 2 हजार 903 मतांनी पराभव केला आहे. सकाळपासूनच या दोन्ही उमेदवारांमध्ये जोरदार स्पर्धा सुरू होती. केंद्रीय मंत्री सुरेश अंगडी यांच्या निधनानंतर बेळगावमध्ये पोटनिवडणूक झाली. या निवडणुकीत भाजपने दिवंगत नेते सुरेश अंगडी यांची पत्नी मंगला अंगडी यांना उमेदवारी दिली. तर, सतीश जारकीहोली कॉंग्रेसकडून ही निवडणूक लढवत होते. परंतु, मंगला अंगडी यांनी निवडणूक जिंकून बेळगावमध्ये भाजपचा झेंडा फडकला आहे.
बेळगाव लोकसभेच्या पोटनिवडणुकीत एकूण 10 उमेदवार रिंगणात होते. भाजपकडून मंगला अंगडी काँग्रेसकडून सतीश जारकीहोळी तर महाराष्ट्र एकिकरण समितीचे उमेदवार शुभम शेळके हे रिंगणात होते. कर्नाटक राष्ट्र समितीकडून विवेकानंद बाबू घंटी उमेदवार होते. अटीतटीची झालेल्या या निवडणुकीत अगदी शेवच्या फेरीपर्यंत चुरस कायम होती. शेवटच्या तीन फेऱ्या असताना भाजपच्या मंगला अंगडी यांनी पुन्हा आघाडी घेतली होती. 3500 मतांनी आघाडीवर असलेल्या मंगला अंगडी यांनी अखेर 2903 मतांनी विजय मिळवला आहे. हे देखील वाचा- समाधान आवताडे यांनी पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीत विजय मिळवल्यानंतर मानले सर्वांचे आभार
बेळगावातील ही पोटनिवडणूकही बऱ्याच काळापासून महाराष्ट्र व कर्नाटकमधील सीमा वादाचे केंद्र आणि महाराष्ट्रातील सीमेवर असल्याने भाजपा विरुद्ध शिवसेना म्हणूनही पाहिले जात होते. परंतु, कॉंग्रेस व शिवसेनेचा विजय खेचून मंगला अंगडी बेळगावात भाजपचा झेंडा रोवला आहे.