Belgaum Border Dispute: अखेर बेळगाव सिमा प्रश्नाच्या वादावर तोडगा निघणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची महत्वपूर्ण घोषणा
Eknath Shinde | (Photo Credit - Facebook)

बेळगाव सिमावाद हा गेल्या कित्येक दशकांपासून जैसे थे आहे. सरकार आलीत गेलीत पण यावर ठोस असा काहीही तोडगा निघाला नाही. पण शिंदे फडणवीस सरकारमध्ये मात्र हा इतिहासिक निर्णय होण्याची शक्यता आहे. किंबहुना याबाबत महत्वपूर्ण माहिती खुद्द राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत दिली आहे. बेळगाव सह सीमाप्रश्नाबाबत चर्चा करण्यासाठी आज सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. हा लढा पुढे नेण्यासाठी अनेक महत्वाचे निर्णय या बैठकीत घेण्यात आले, अशा आशयाचं ट्विट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलं असुन आता लवकरचं बेळगाव सिमा वादावर निर्णय होणार ही शक्याता नाकारता येत नाही. तसेच सीमा आंदोलनातील हुतात्म्यांच्या कुटुंबियांना देखील स्वातंत्र्यसैनिकांप्रमाणेच दुप्पट निवृत्ती वेतन देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. सीमावर्ती भागातील नागरिकांवर होणारे अन्याय दूर व्हावेत यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पंतप्रधान मोदींसह गृहमंत्री अमित शाहांची भेट घेणार आहेत.

 

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रेरणेतून सीमावर्ती भागातील प्रत्येक बांधवाला न्याय देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे, असं म्हणत या सिमावादावर लवकरचं तोडगा काढण्याचं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं आहे. कर्नाटकातील मराठी भाषिकांसाठी धर्मादाय निधी, वैद्यकीय सहायता कक्षाचा निधी, मंत्र्यांची नियुक्ती, वेळोवेळी प्रश्न सोडवण्यासाठी समर्पित कक्ष असे अनेक विषय तातडीने मार्गी लावण्यात येतील असं देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सांगितलं आहे. (हे ही वाचा:- Maharashtra Hutatma Smruti Din 2022: महाराष्ट्र राज्य हुतात्मा स्मृती दिन निमित्त CM Eknath Shinde, Dy CM Devendra Fadnavis यांनी वाहिली हुताम्यांना श्रद्धांजली!)

सर्वोच्च न्यायालयात असलेला दाव्याच्या अनुषंगाने कायदेशीर बाबींवर चर्चा,राजकीय पातळीवर प्रयत्न,मराठी भाषिकांचे प्रश्न आणि त्यासाठी तातडीने करावयाच्या बाबी इत्यादी बाबींवर आज सर्वपक्षिय बैठकीत चर्चा झाली.राज्य सरकारने या सर्व प्रयत्नांना भक्कम सहकार्य असेल, हे आश्र्वस्त केले आहे. तरी या बैठकीस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , मंत्री चंद्रकांतदादा पाटील, तानाजी सावंत, दीपक केसरकर, शंभुराजे देसाई उपस्थित होते. तसेच विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, एकीकरण समितीचे किरण ठाकूर, माजी आमदार राजेश क्षीरसागर, मुख्य सचिव, इतर अधिकारी यांनी या सभेस विशेष उपस्थिती दर्शवली होती.