Belapur Crime: अमानुषतेचा कळस! मित्राच्या गुप्तांगात लाटणं घालत काढला व्हिडीओ
CRIME | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com

हल्ली शारिरीक छळ (Physical Abuse) किंवा शोषणाचे प्रकार वाढले आहेत. पण मित्रचं मित्राचा घात करेल ही घटना धक्कादायक आहे. स्त्री सुरक्षित (Female Safety) नाही पण अमानुषतेची वृत्ती असलेल्या पुरुष तरी सुरक्षित आहेत का असा सवाल विचारण्याची वेळ आली आहे. कारण बेलपूरात (Belapur) हा धक्कादायक प्रकार घडला आहे. एका मित्राने आपल्या घरी पार्टी ठेवत आपल्या काही जवळच्या मित्रांना पार्टीत बोलावले. दरम्यान सगळ्यांनी दारु प्यायली. त्यानंतर त्यांनी चौघापैकी एका मित्राची थट्टा मस्करी करण्यास सुरुवात केली. यापूर्वी देखील त्याच्या शरिर रचनेवरुन हे सगळे त्या मित्राची कायम थट्टा करत असत. यावेळी मजा मस्करीत या तरुणाच्या अंगावरचे कपडे काढले आणि बघता बघता या तरुणास संपूर्ण नग्न केले. नंतर त्या तरुणाच्या गुप्तांगात लाटणं घालत त्याचा व्हिडीओ (Video) काढला. पिडीत तरुण वेदनेने ओरडत होता पण त्याच्या मित्रांनीच अमानुषतेचा कळस गाठला होता.

 

बघ्या मित्रांना व्हिडीओ (Video) काढताना मजा वाटत होती. पण काहीच वेळात पिडीत तरुणाच्या गुप्तांगातून रक्तस्त्राव होण्यास सुरुवात झाली. तोच हे कृत्य करणाऱ्या तीघांपैकी एकाने ह्याची दखल घेत पिडीत तरुणास इस्पितळात (Hospital) दाखल केले. डॉक्टरांनी पिडीतवर उपचार करण्यास सुरु केले आण सध्या पिडीत तरुण गंत्रीर जखमी आहे. मोठा रक्तस्त्राव झाल्याने तरुण अजूनही बेशुध्द (unconscious) अवस्थेत आहे. (हे ही वाचा:- Nashik Rape Cases: नाशिक मध्ये आश्रम चालवण्याच्या नावाखाली बलात्कार प्रकरणी अजून 5 पीडीता  आल्या समोर; IPC, POCSO Act, SC/ST Atrocities Act अंतर्गत गुन्हा दाखल)

 

घडलेल्या संपूर्ण प्रकारबाबत डॉक्टरांनी बेलापूर पोलिसांना (Belapur Police) माहिती दिली. डॉक्टरांनी दवाखाण्यात दाखल होत हे अमानुष कृत्य करणाऱ्या एकास ताब्यात घेतल. तरुण गुन्हा घडलेले घटनास्थळी पोहचून घटनास्थळाची पाहणी करता उर्वरीत दोन गुन्हेगार फरार आहेत. पोलिस या प्रकरणाचा शोध घेत आहेत. तरी मित्रानेच मित्राबाबत असं कृत्य करणे म्हणजे फक्त मैत्रीच्या नात्यावरचं नाही तर माणुसकीला काळीमा फासण्यासारखं आहे.