Beed ZP OBC, SC, ST Reservation: बीड जिल्हा परिषद निवडणूक आरक्षण जाहीर, पाहा कोणते गट ओबीसी, एसी, एसटी राखीव
Beed ZP Reservation | (Photo Credit: Archived, edited, representative images)

राज्यात ओबीसी आरक्षणाची (OBC Reservation) चर्चा सुरु असतानाच तिकडे बिड जिल्हा परिषद आणि त्यांतर्गत येणाऱ्या पंचायत समिती सदस्यांच्या निवडणुकीसाठी आरक्षण (Beed ZP Reservation) काढण्यात आले आहे. बीड जिल्हा परिषदेत एकूण 69 गट आहेत. या गटासाठी काढण्यात आलेल्या आरक्षणात ओबीसी, एसी, एसटीसह (OBC, SC, ST Reservation) महिला आरक्षणाचाही समावेश आहे. नियमाप्रमाणे जिल्हा परिषदेचे आरक्षण हे बिडच्या जिल्हाधिकारी कार्यालयातून काढण्यात आले. तर, पंचायत सिमितीसाठीचे आरक्षण तहसीलदार कार्यालयातून काढण्यात आले.

कसे असेल आरक्षण?

खुला प्रवर्ग पुरुष- 20

सर्वसाधारण महिला- 21

ओबीसी- 18

अनुसूचित जाती-9

अनुसूचित जमाती-1

गटांसाठी जाहीर झालेले आरक्षण आरक्षण

अनुसूचित जातीसाठी आरक्षित गट- मापुर, मोगरा, किट्टीआडगाव, पिंपळनेर, चौसाळा, मुर्शदपुर, होळ, भोगरवाडी, बर्दापुर

अनुसूचित जाती महिला आरक्षित गट- उमापुर, मुर्शदपुर, भोगलवाडी, पिंपळनेर, किट्टीआडगाव

अनुसूचित जमातीसाठी आरक्षित गट - जिरेवाडी

ओबीसी आरक्षित गट- रेवकी, तलवाडा, पाडळसिंगी, जोगाईवाडी, पात्रुड, दिंद्रुड, नाळवंडी, रायमोह, डोंगरकिन्ही, बीड सांगवी, आष्टा, तेलगाव, पिंप्री, सिरसाळा, धर्मापुरी, पट्टीवडगाव, मादळमोही, मातोरीया

ओबीसी आरक्षित महिला गट- रेवकी, बीड सांगवी, तलवाडा, मातोरी, डोंगरकिन्ही, नाळवंडी, पाडळसिंगी, पिंप्री, जोगाईवाडी

सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित गट- ताडसोन्ना, पाडळी, सौताडा, दौलावडगाव, धानोरा, आडस, आसरडोह, चनई, गढी, सादोळा, चिंचोली माळी, टोकवाडी, टाकरवण, धोंडराई, पाली, दाऊतपुर, घाटनांदूर, वीडा, राजुरी, बहिरवाडी, नागापूर (हेही वाचा, New Voter List Registration Rule: अरे व्वा! आता 17 व्या वर्षीच मतदार यादीत नाव, निवडणूक आयोगाचा महत्त्वपूर्ण निर्णय; Voter ID Card मिळविण्यासाठी कशी कराल नोंदणी? घ्या जाणून)

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणाबाबतचा निर्णय घेतला. त्यानंतर बीड जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यांचे आरक्षण काढण्यात आलं आहे. आरक्षणामुळे काही इच्छुकांना आनंद झाला आहे. तर, काहींची मात्र चांगलीच गैरसोय झाली आहे.