Elections | (File Image)

मतदानासाठी इच्छूक असलेल्या पण वयाची अट पूर्ण न केलेल्या नवोदित मतदार तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. आता तुम्ही तुमचे नाव वयाच्या 17 व्या वर्षीही मतदार यादीवर (Electoral Roll) पाहू शकतो. महत्त्वाचे म्हणजे त्यासाठी आता 18 वर्षे वाट पाहण्याची आवश्यकता नाही. वयाची 17 वर्षे पूर्ण केलेल्या कोणत्याही व्यक्तीस मतदार यादीवर नावनोंदणी (New Voter List Registration Rule) करता येणार आहे. अर्थात मतदार यादीवर नाव आले म्हणून सदर व्यक्तीस मतदान करता येणार नाही. मतदानासाठी मात्र त्याला 18 वर्षे पूर्ण होणेच बंधनकारण असणार आहे. भारतीय निवडणूक आयोगाने नव्या नियमाद्वारे नागरिकांना ही संधी उपलब्ध करुन दिली आहे.

मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार आणि निवडणूक आयुक्त अनुप चंद्र पांडे यांच्या नेतृत्वाखालील भारतीय निवडणूक आयोगाने देशभरातील सर्व राज्यांचे मुख्य निवडणूक अधिकारी, निवडणूक नोंदणी अधिकारी, सहायक निवडणूक नोंदणी अधिकारी यांना दिलेल्या निर्देशानुसार नव्या सूचनेनुसार मतदारांची नोंदणी पार पडणार आहे. नव्या नियमानुसार मतदार यादीत नावनोंदणी करण्यासाठी वयवर्षे 17 पूर्ण असलेल्या तरुणांनी आपापले नाव नोंदणी अर्ज एक एप्रिल, एक जुलै आणि एक ऑक्टोबर या पात्रता तारखांच्या कालावधीमध्ये पोहोचवावे अथवा दाखल करावेत असे आयोगाने म्हटले आहे. तरुणांना हे अर्ज दाखल करण्यासाठी एक जानेवारीपर्यंत प्रतिक्षा करायला लागू नये यासाठी आवश्यक ती तांत्रिक मदत घेण्यात यावी असेही मुख्य निवडणूक आयोगाने म्हटले आहे. (हेही वाचा, Voting Card-Aadhar Card Link: मतदार ओळखपत्र आधार कार्डाशी संलग्न करण्याचे निवडणूक आयोगाचे निर्देश)

ट्विट

मुख्य निवडणूक आयोगाने स्पष्ट केल्यानुसार देशभरातील मतदार याद्या आता दर तिन महिन्यांनी अद्ययावत केल्या जातील. त्यामुळे मतदानासाठी पात्र होण्यासाठी वयोमर्यादा प्राप्त केलेल्या तरुण तरुणांना नावनोंदणी शक्य होणार आहे. लोकप्रतिनिधी कायदा 1950 च्या कलम 14(b) मधील कायदेशीर सुधारणांच्या अनुषंगाने आणि पर्यायाने मतदार नोंदणी नियम, 1960 मध्ये भारतीय निवडणूक आयोगाने बदलाची प्रक्रिया सुरु केली आहे. नव्या नियमानुसार विधानसभा किंवा संसदीय मतदारसंघाच्या मतदार याद्यांच्या तयारी/पुनरिक्षणासाठी आवश्यक बदल केले जाणार आहेत.