मतदार ओळखपत्र (Voting Card) आधार कार्डाशी (Aadhar Card) संलग्न (Link) करण्याचे निवडणूक आयोगातर्फे (Election Commission Of India) निर्देश देण्यात आले आहेत. या विशेष मोहिमेला 1 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. भारत निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे (Shrikant Deshpande) यांनी संबंधीत माहिती दिलेली आहे. तसेच येत्या 1 ऑगस्टपासून नागरिकांनी आपलं मतदार ओळखपत्र आधार कार्डाशी संलग्न करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांची माहिती-
आता मतदार ओळखपत्र होणार आधार कार्डाशी संलग्न
भारत निवडणूक आयोगातर्फे मतदार ओळखपत्र आधार कार्डाशी संलग्न करण्याची विशेष मोहीम राज्यभर १ ऑगस्टपासून सुरू होणार@DDNewslive @DDNewsHindi #ElectionCommision pic.twitter.com/akrMhdtwde
— DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या (@ddsahyadrinews) July 25, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)