बीड: परळी शहरात स्टेट बँकेचे 5 कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आल्याने आजपासून 8 दिवस लॉकडाऊनचे आदेश
Coronavirus Lockdown | File Image | (Photo Credits: PTI)

देशभरासह महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसागणिक वाढत चालला आहे. त्यामुळे कोरोनाच्या हॉटस्पॉट ठिकाणी पुन्हा लॉकडाऊनचे आदेश देण्यात आले आहेत. राज्यातील मुंबई, पुणे, ठाणे आणि नवी मुंबईत कोरोनाच्या रुग्णांचा आकडा सर्वाधिक आहे. याच दरम्यान आता परळी शहरात 4 जुलैला स्टेट बँक ऑफ इंडिया मधील पाच कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली. याच कारणास्तव आता परळी शहरात आजपासून पुढील 8 दिवस लॉकडाऊन कायम राहणार असल्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे.(Coronavirus Update: महाराष्ट्रात 2 लाखाहुन अधिक कोरोनाबाधित; तुमच्या जिल्ह्यात किती कोरोना रुग्ण जाणुन घ्या)

परळी शहरात येत्या 12 जुलै पर्यंत रात्री 12 वाजेपर्यंत पूर्णपणे लॉकडाऊन असणार असल्याचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी स्पष्ट केले आहे. लॉकडाऊनच्या काळात नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडता येणार नाही आहे. अन्यथा नागरिकांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे ही स्पष्ट करण्यात आले आहे. तसेत शहरात परवानगी शिवाय कोणलाही लॉकडाऊनच्या काळात प्रवेश करण्यासह शहराबाहेर जाण्यास बंदी असणार आहे.(कोविड-19 संसर्गावर नियंत्रण मिळवणे हे सरकारचे प्रथम प्राधान्य, इतर गोष्टी दुय्यम; विरोधकांच्या टीकेला आदित्य ठाकरे यांचे उत्तर)

दरम्यान, राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा 2 लाखांच्या पार गेला आहे. शनिवारी आलेल्या आकडेवारीनुसार राज्यात 7074 कोरोनाबाघित रुग्णांची भर पडली असून 295 जणांचा बळी गेल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली. तसेच आता अनलॉकची प्रक्रिया सुरु झाली असून लॉकडाऊनचे नियम शिथिल करत काही गोष्टी सुरु करण्यास सरकारने परवानगी दिली आहे. परंतु नागरिकांना नियमांचे पालन करावे असे आवाहन ही करण्यात आले आहे.