बीड (Beed) मधील मजलगाव (Majalgaon) येथे राहणार्या एका 30 वर्षीय व्यक्तीची त्याच्या लहान भावाकडूनच हत्या करण्यात आल्याचं वृत्त समोर आले आहे. त्याचा मृतदेह एका झाडाला लटकलेल्या अवस्थेमध्ये आढळलं आहे. मृत भावाचं नाव बापू कदम आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, गणेश ने त्याच्या भावाची हत्या आईचा गळा त्याच्याच मोठ्या भावाने कापल्याच्या रागातून केल्याचं सांगण्यात आलं आहे.
बुधवार (1 सप्टेंबर) दिवशी परूबाई यांची त्यांच्या मोठ्या मुलासोबत बाचाबाची झाली. टाईम्स ऑफ इंडियाच्या माहितीनुसार, नशेमध्ये असलेल्या परूबाई यांच्या मोठ्या मुलाने आईचा गळा कापला. गणेश या परूबाईच्या लहान मुलाने सारा प्रकार पाहिला होता. परूबाईंना कुटुंबीय हॉस्पिटल मध्ये घेऊन गेल्यानंतर त्यानेही रागाच्या भरात मोठ्या भावाचा गळा दाबला. (नक्की वाचा: बायकोला माहेरी घेऊन गेलेल्या पतीची पूर्व प्रियकराकडून हत्या; अकोला येथील धक्कादायक प्रकार) .
गणेशला जेव्हा कळलं की मोठा भाऊ बापू कदम याचा मृत्यू झाला आहे तेव्हा त्याने त्याचा मृतदेह जवळच्या शेताजवळ नेला. त्याला झाडावर लटकवून ती आत्महत्या असल्याचं भासवलं. नंतर पोलिस तपास सुरू झाला. सार्यांची चौकशी सुरू झाली त्यावेळी ज्या अवस्थेमध्ये बापू कदमचा मृतदेह झाडावर लटकवला होता ते पाहता जाही गावकर्यांनी शंका बोलून दाखवली. पोलिसांच्या लक्षात काही चूका आणि गणेशच्या वागण्या-बोलण्यात काही संशयास्पद गोष्टी आढळल्या. नंतर गणेशने आपला गुन्हा कबूल केला. आई हल्ल्यातून बचवणार नाही या रागातून त्याने भावावर जीवघेणा हल्ला केल्याचं गणेश कदमने कबूल केले आहे.
दरम्यान पारूबाई यांच्यावर हॉस्पिटल मध्ये उपचार आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. गणेश कदमला पोलिसांनी अटक केली असून त्याच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.