Beed Crime: हनुमान गडाचे मठाधिपती बुवासाहेब खाडे महाराज यांच्यावर लैंगिक अत्याचाराचे आरोप
Buvasaheb Khade Maharaj | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

बीड (Beed Crime News) जिल्ह्यातील एका महाराजावर बलात्काचा गुन्हा (Beed Rape Case) दाखल झाला आहे. हा महाराज बीड येथील हनुमान गडाचा (Hanuman Gad) मठाधिपती असल्याचे समजते. त्याचे पूर्ण नाव नाव बुवासाहेब जिजाबा खाडे (Buvasaheb Khade Maharaj) असं आहे. या घटनेनंतर संपूर्ण बीड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. एका महिलेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर तिच्या सहमतीशिवाय वारवार लैंगिक अत्याचार केल्याचा महाराजावर आरोप आहे. पीडित महिलेने गुरुवारी रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास दिलेल्या तक्रारीवरुन हा गुन्हा दाखल झाला आहे.

पीडितेने आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, बुवासाहेब जिजाबा खाडे या इसमाने जून 2022 ते जुलै 2022 या काळात आपल्यावर सहमती नसताना जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केले. या व्यक्ती ने आपल्याला लग्नाचे आमिष दाखवले. प्रत्यक्षात माक्ष कधीच लग्न केले नाही. आपला छळ आणि फसवणूक झाली असल्याची कैफीयत या महिलेने तक्रारीच्या माध्यमातून मांडली आहे. (हेही वाचा, Mumbai Shocker: तरुणाचे समलिंगी जोडीदारावर मेणबत्ती आणि रॉडने लैंगिक अत्याचार; गुन्हा दाखल, पोलिसांकडून अटक)

दुसऱ्या बाजूला, बुवासाहेब जिजाबा खाडे यानेही महिलेविरोधात तक्रार दिली आहे. आपल्याला मारहाण करुन आपल्याजवळी सोन्याचा ऐवज लूटल्याचा उल्लेख खाडे याने केलेल्या तक्रारीत आहे. खाडे याच्या तक्रारीवरुन पाच जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

प्राप्त माहितीनुसार, बुवासाहेब जिजाबा खाडे हे बीड जिल्ह्यातील हे बऱ्यापैकी बडे प्रस्त आहे. खाडे याला महाराज म्हणून संबोधले जाते. तो हनुमान गडाचा मठाधिपती सुद्धा आहे.बीड जिल्हा आणि खास करुन जामखेड परिसरात त्यांचे अनेक भक्त असल्याचे सांगितले जाते. आता महाराजांवरच गुन्हा दाखल झाल्याने भक्तांमध्ये आश्चर्य व्यक्त होते आहे.