Female Lawyer Beating Beed | (Photo Credit - X/@Awhadspeaks)

मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे बीड जिल्हा राज्यभर चर्चेत आला. आता तर या जिल्ह्यातील गुन्हेगारी विश्वाची नवनवी रुपं दररोज पुढ येऊ लागली आहे. अशीच एक घटना शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार जितेंद्र (Jitendra Awhad) आव्हाड यांनी एक्स पोस्टवर उजेडात आणली आहे. जिल्ह्यातील सत्र न्यायालयात वकिली करणाऱ्या एका महिलेस अंबाजोगाई (Ambajogai) तालुक्यातील एका गावच्या सरपंच आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी रिंगण करुन बेदम मारहाण (Female Lawyer Assaulted Beed) केली आहे. लाकडी काठ्या आणि गॅस पाईपने मारहाण केल्याने या महिलेचे शरीर अक्षरश: काळेनिळे पडले आहे.

मारहाणीनंतर वैद्यकीय उपचार करुन सोडले घरी

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी या घटनेची छायाचित्रे आणि एक पोस्ट सोशल मीडिया मंच एक्सवर शेअर केली आहे. ज्यामुळे बीड जिल्ह्यातील या प्रकरणास वाचा फुटली आहे. आव्हाड यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये घटनेबाबत केलेल्या उल्लेखानुसर, अंबाजोगाई तालुक्यातील एका गावातील सदर महिला जिल्हा सत्र न्यायालयात वकिली करते. परिसरात वापरले जाणारे डीजे, लाऊडस्पिकर आणि पिठाच्या गिरण्या यांमुळे माग्रेनचा त्रास होतो. त्यामुळे त्यावर कारवाई करुन ते हटविण्यात यावे, अशी तक्रार आणि मागणी सदर महिलेने प्रशासनाकडे केली होती. त्यानंतर गावचे सरपंच आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी महिलेला शेतात नेऊन जबरी मारहाण केली. मारहाण इतकी बेदम होती की, ती सहन न झाल्याने महिला जागीच बेशुद्ध पडली. त्यानंतर तिच्यावर रुग्णालयात नेऊन उपचार करण्यात आले आणि तिस पुन्हा घरी सोडण्यात आले. (हेही वाचा, Ranjit Kasle in Police Custody: बीड येथील निलंबित एसपी रणजित कासले पोलिसांच्या तब्यात)

महिलेची ओळख गुप्त

जितेंद्र आव्हाड यांनी मारहाण झालेल्या महिलेची छायाचिक्षत्रे तिची ओळख जाहीर होणार नाही याची काळजी घेत प्रसारित केली आहेत.

महिलेचे काळेनिळे पडलेले शरीर अन् आव्हाड यांची पोस्ट

Female Lawyer Assaulted Beed.jpg
बीड येथे वकील महिलेस झालेली मारहाण | (Photo Credit - X/@Awhadspeaks)

गुन्हेगारांचे क्रूर कृत्य

दरम्यान, गुन्हेगारी कृत्यांमुळे बीड जिल्हा पाठिमागील काही दिवसांपासून प्रचंड चर्चेत आहे. ज्यामध्ये खंडणी, अपहरण, हत्या आणि इतरही विविध प्रकारांचा समावेश आहे. या गुन्हेगारीस राजकीय वरदहस्त आणि अप्रत्यक्षरित्या पोलीस संरक्षण असल्याचेही विविध घटनांमधून पुढे आले आहे. मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात गुन्हेगारी पार्श्वभूमी लोकांचे राजकीय नेत्यांशी असलेले घनिष्ठ संबध तर अधिक ठळकपणे पुढे आले आहेत. या प्रकरणात तर राजकीय पक्षाचे पदाधीकारीच गुन्ह्यांमध्ये गुंतल्याचेही पुढे आल्याने संबंध जिल्हाच राजकीय वर्तुळात चर्चेत आला आहे.