Beed crime: बदला घेण्याच्या वृत्तीने दोन चिमुकल्या भांवडांची हत्या, बीड हादरलं
Poison | Representational Image (Photo Credits: Pixabay)

Beed Crime: बदला घेण्याच्या भावनेतून नात्यातल्या महिलेने चक्क चिमुकल्या बहिण आणि भावाला विष देऊन मारल्याची घटना समोर आली आहे. ही घटना बीड येथे घडली आहे. या घटनेनंतर बीड गावात एकच खळबळ उडाली. पोलिसांनी आरोपींनी अटक केली आहे. 20दिवसांनंतर पोलिसांनी हत्येचा उलगडा केला आहे. तनूजा (वय वर्ष 2 ), किशोर अमोल भावले 13 महिने अशी मृत बालकांची नावे आहेत. स्वाती उमाजी भावले असं आरोपीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना 29 डिसेंबर 2023 रोजी घडले होती. बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील पांढरवाडी येथील तनुजा आणि किशोर या या दोन भांवडाची हत्या केलीय पूर्व वैमनस्यातून हत्या केल्याचे समोर आले आहे. 29 डिसेंबरच्या दुपारी अचानक दोघांना उलट्या सुरु झाल्या त्यानंतर दोघांनाही तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. दोघांवर वेगवेगळ्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. किशोरला बीडच्या रुग्णालयात तर तनुजाला छत्रपती संभाजीनगरच्या एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

दोघचं उपचारा दरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. या प्रकरणात सुरुवातीला तलवाडा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. काही दिवसांनी ही घटना हत्येची असल्याचे समोर आले. पोलिसांनी घरात चौकशी सुरु केली आणि तपासणी करता करता त्यांना आरोपींचा शोध लागला. काही महिन्यांपूर्वी शेजारी राहणाऱ्या

सखुबाई ज्योतीराम भावले हिने आरोपी स्वाती हिचा सासरा सुखदेव भावले याने माझी लेक वैशाली हिला नांदु दिले नाही.बदला घ्याण्याच्या वृत्तीने दोघांनाही उंदीर मारण्याचे औषध खावू दिले. मयत मुलांना औषध देणारी आरोपी स्वाती ही मुलांची चुलती होती. चौकशीतून सर्व घटना उघडकीस आल्या पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपींना ताब्यात घेतले.