Beed Accident: पिकअप आणि कंटेनरची जोरदार धडक, बीड येथील भीषण अपघातात 5 जणांचा जागीच मृत्यू
Accident (PC - File Photo)

Beed Accident:कंटेनर आणि पिकअपची जोरदार धडक झाल्याने भीषण अपघात झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. हा अपघात अहमदनगर अहमदपूर राष्ट्रीय महामार्गावर बीड येथील ससेवडी गावाजवळ झाला आहे. या अपघातात ५ जणांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात मृतांची संख्या वाढण्याची शक्यता असल्याचे पोलिसांनी माहिती दिली. नेकनूर पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहे. या अपघातात दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाली त्यामुळे वाहनांचा चक्काचूर झाला आहे. (हेही वाचा- हिंगोलीत बाईकचा भीषण अपघात, दुर्घटनेत एकाच कुटुंबातील तीन सदस्यांचा मृत्यू)

सुत्रांच्या माहितीनुसार, ससेवाडी गावाजवळ कंटेनर आणि पिकअपची धडक झाल्याने अपघात झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच, नेकनुर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी अडकलेल्या मृतांना बाहेर काढले. मृतांना रुग्णालयाक दाखल करण्यात आले. अपघातात मृत झालेले लोक हे महाजनवाडी गावातील असल्याची माहिती मिळाली. प्रल्हाद सिताराम घरत (वय 63, रा.महाजनवाडी ता.जि.बीड), नितिन प्रल्हाद घरत (41, रा.महाजनवाडी ता जि.बीड), विनोद लक्ष्मण सानप (41, रा.वाघिरा ता.पाटोदा जि.बीड) असे अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत.

मृतांमध्ये दोघांची ओळख अद्याप समजू शकली नाही.  अपघातानंतर घटनास्थळी गावकऱ्यांनी गर्दी केली. अपघातानंतर कंटेनर मधील लोखंडी पाईप हे रस्त्यावर विखुरले होते. त्यामुळे रस्त्यावर वाहतूक सेवा ठप्प झाली होती. पोलिसांनी काही वेळानंतर वाहतुक सेवा सुरळीत केली.