कोरोना काळात सायबर गुन्हे (Cyber Crime) खूपच वेगाने वाढत असल्याचे दिसत आहे. गेल्या अनेक वर्षाच्या तुलनेत सायबर गुन्हे दुप्पट झाले आहेत. गंभीर गुन्ह्यांपेक्षा सायबर गुन्ह्यांचे प्रमाण दुप्पटीपेक्षा जास्त असल्याच्या दिसून आले आहे. दरम्यान, ऑनलाइन बँकिंग फ्रॉड, सोशल मीडियावरून होणारे गुन्हे आणि ऑनलाइन खरेदीच्या माध्यमातून सायबर गुन्हेगारांनी नागरिकांना लूबाडले जात आहे. नागरिकांची फसवूक करण्यासाठी सायबर गुन्हेगारांकडून अनोखी शक्कल लढवली जात आहे. यातच नागरिकांना जाळ्यात अडकवण्यासाठी सायबर गुन्हेगारांनी नवा पर्याय शोधून काढला आहे. याचपार्श्वभूमीवर नागरिकांनी कोणत्याही अफवांना बळी पडू नये म्हणून महाराष्ट्र सायबरने (Maharashtra Cyber) महत्वाची माहिती दिली आहे.
महाराष्ट्र सायबरने अधिकृत ट्विटर हॅंडलवरून दिलेल्या माहितीनुसार, केबीसी द्वारा घेण्यात आलेल्या भारतीय सिम कार्ड लकी ड्रा स्पर्धेअंतर्गत तुम्ही 25 लाखाचे बक्षिस जिंकले आहात. यासाठी तातडीने केबीसी विभागाच्या हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधून तुमचे बक्षीस घेऊन जा, असे सांगण्यात आले आहे. तसेच एक व्हॉट्सअप नंबर देण्यात आला आहे. या नंबरवर फोन कॉल न करता व्हॉट्सअप कॉल करण्याचे सांगण्यात आले आहे. मात्र, या नंबरवर व्हॉट्सअप कॉल केल्यानंतर तुमच्या बॅंकेच्या खात्यातून सर्व पैसे गायब होण्याची शक्यता आहे. यामुळे नागरिकांनी अशा प्रकारच्या कोणत्याही अफवांना बळी पडू नका, असे आवाहन महाराष्ट्र सायबरकडून वारंवार करण्यात येत आहे. हे देखील वाचा- उत्तर प्रदेश: रियल इस्टेटमध्ये गुंतवणूक केल्यास 5 वर्षात दुप्पट रक्कम मिळवण्याचे स्वप्न दाखवत शेकडो लोकांना घातला गंडा
ट्वीट-
New scam Alert📢❌ #cybersafety #cyberfit #cyberalert #cybersecurity #onlinesecurity #onlinesafety #informationsecurity #mahacyber #cybersecurityawareness #staysafe #stayalert pic.twitter.com/dPSapbJlZP
— Maharashtra Cyber (@MahaCyber1) March 22, 2021
दरम्यान, नागरिकांची दिशाभूल करण्यासाठी या पोस्टरमध्ये महात्मा गांधी, पंतप्रधान नरेंद्र मोदी, महानायक अमिताभ बच्चन आणि रिलायन्स कम्युनिकेशन्सचे अध्यक्ष अनिल अंबानी यांचाही फोटो लावण्यात आला आहे.