मद्याच्या बाटल्यांवर बारकोड होणार बंधनकारक, अवैध मद्यविक्रीला आळा घालण्यासाठी शासनाची महत्त्वपुर्ण निर्णय
प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-PTI)

राज्यातील अवैध मद्यविक्रीला आळा घालण्यासाठी उत्पादन शुल्क विभागाने मद्याच्या बाटल्यांवर बारकोड पद्धती आणण्याचा निर्णय घेतला आहे. 15 ऑगस्टपर्यंत ह्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जातील असे उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrshekhar Bavankule) यांनी सांगितले आहे.

दिवसेंदिवस राज्यामध्ये अवैध मद्यविक्री करणे, अवैध मद्यसाठा सापडणे यांसारख्या घटना वाढत आहेत. त्यामुळे ह्या गोष्टीची गंभीर दखल घेत त्यावर योग्य तो तोडगा काढण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने एक पत्रकार परिषद जाहीर केली होती. या पत्रकार परिषदेत अवैध मद्यविक्रीमुळे ग्राहकांना मिळणारा मद्याचा दर्जा आणि सरकारचा बुडणारा महसूल हे दोन महत्त्वाचे प्रश्न होते. त्यामुळे त्यावर तोडगा काढण्यासाठी देशी आणि विदेशी दारुच्या बाटल्यांच्या झाकणांवक बारकोड बंधनकारक करण्यात येणार आहे.

उत्तर प्रदेश: विषारी दारु प्यायल्याने 14 जणांचा मृत्यू, 12 अधिकारी निलंबित

एका अॅपच्या साहाय्याने हे बारकोड तपासल्यास संबंधित मद्य वैध आहे की नाही याची पडताळणी होईल. त्यामुळे अवैध मद्यविक्रीला आळा बसेल, असे बावनकुळे यांनी सांगितले.

असे केल्यास ग्राहकाला स्वत:लाच आपण चांगल्या दर्जाचे मद्य घेतले की नाही ते समजेल. आणि अवैध मद्यांमुळे सरकारचे होणारे आर्थिक नुकसानही काही प्रमाणात कमी होईल.