
एप्रिल महिन्यापासून नवं आर्थिक वर्ष सुरू होतं त्यामुळे मार्च महिन्याच्या अखेरीच्या काही दिवसांमध्ये बॅंकांवर कामाचं ताण असतो. यंदा मार्च एंडला रमजान ईदचा सण आल्याने आणि त्या पूर्वी रविवार/ गुढी पाडवा आल्याने गोंधळ वाढला आहे. आरबीआय कडून याआधी 31 मार्चला ईदची सुट्टी होती पण इयर एंडच्या कामामुळे ही सुट्टी रद्द करण्यात आली आहे. भारतात सर्वत्र 31 मार्चला बॅंका ईदची सुट्टी असली तरीही सुरू राहणार आहे. शेवटचे काही आर्थिक व्यवहार, टॅक्सशी निगडीत काही गोष्टी यांचा निपटारा करण्यासाठी 31 मार्चला बॅंका सुरू ठेवल्या जातील.
29-30 मार्चला बॅंका सुरू राहणार की बंद?
29 मार्च हा पाचवा शनिवार आहे. तर 30 मार्चला रविवार आहे. 29 मार्चला बॅंका शनिवार असल्याने सुरू असतील. 30 मार्चला काही निवडक बॅंका टॅक्स पेमेंटच्या काही कामांसाठी सुरू ठेवल्या जातील.
बॅंकेतील कर्मचार्यांना त्यांचे ऑनलाईन व्यवहार जसे NEFT, RTGS, मोबाईल बॅंकिंग द्वारा बिल पेमेंट, एटीएम वापरता येणार आहे. मात्र स्थानिक बॅंकांच्या ग्राहकांना बॅंक ग्राहकांसाठी सुरू असलेल्या वेळा तपासून घ्याव्या लागतील. जम्मू कश्मीर मध्ये मात्र 27,28 मार्च हा सुट्टीचा दिवस असणार आहे. नक्की वाचा: RBI Cancelled March 31 Bank Holiday: आरबीआय कडून रमजान ईद निमित्त 31 मार्चची सुट्टी रद्द; Year-End च्या कामांसाठी खुल्या राहणार बॅंका .
एकूणच भारतामध्ये 31 मार्चला रमजान ईदचा सण असला तरीही बॅंका सुरू ठेवल्या जाणार आहेत. ग्राहक त्यांच्या कामासाठी बॅंकेमध्ये जाऊन त्यांची कामं करू शकतात.